तरुण भारत

विक्रमी नोंद! महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

ऑनलाईन टीम / मुंबई : 


कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता एक कोटींहूनही अधिक झाली आहे. अशा प्रकारचा विक्रम करणारे महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. 

Advertisements


कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. 


ताज्या मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे.


आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले की, लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार केला आहे.

 
दरम्यान, सध्या राज्या सुमारे 4100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असेही डॉ.व्यास यांनी सांगितले.

Related Stories

तरुण भारत इम्पॅक्ट : महावितरणच्या पुलाची शिरोली कार्यालयाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी घेतला आढावा

triratna

नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळली; 5 ठार, 35 जखमी

datta jadhav

INS विक्रमादित्यवर आग

datta jadhav

लॉकडाऊन वाढणार

triratna

‘कोरोना’ची धास्ती ठरतेय.. औषधोपचारात अडसर..!

triratna

धक्कादायक : बलरामपूरमध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!