तरुण भारत

पुणे : शहर भाजपचे ‘जोडे मारा’ आंदोलन

  • आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक

ऑनलाईन टीम / पुणे :

मदतीची याचना करणार्या चिपळूणमधील पूरग्रस्त महिलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर अरेरावीची भाषा करणार्या आमदार भास्कर जाधव यांचा निषेध करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकात आज ‘जोडे मारा’ आंदोलन केले.

Advertisements


मुळीक म्हणाले,  भास्कर जाधव यांनी केलेले वर्तन सत्तेची मस्ती आणि गुंडगिरीचे प्रदर्शन करणारे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठीशी घालून मोठी चूक केली आहे. जनता योग्य वेळी याचे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. या अपप्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.


मुळीक पुढे म्हणाले, ‘महापुरामुळे कोकणातील सामान्य माणसाची खूप मोठी वित्त हानी झाली आहे. घर-संसार-व्यवसायाचे मोठे नुकसान झाल आहे. अशा वेळी नागरिक सरकारकडे मायबाप नात्याने मदतीची विनंती करत असताना सरकारमधील आमदार त्याची कुचेष्टा करतात. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या कृत्याचा आज आम्ही जोडे मारून निषेध केला.


शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, सुशील मेंगडे यांच्यासह मतदारसंघांचे अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Stories

फळांच्या राज्याची अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एपीएमसीमध्ये 50 हजार पेट्यांची आवक

triratna

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन ; सुरक्षा यंत्रणांकडून घटनास्थळाची तपासणी

triratna

कोविशिल्डचा दर राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रतिडोस

triratna

‘दगडूशेठ गणपती’ ट्रस्टच्या जय गणेश ज्ञानवर्धन अभियानातील विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

Rohan_P

‘मोहरम’ संदर्भात गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Rohan_P

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण ; राज ठाकरेंकडून शुभेच्छा देत सन्मान

triratna
error: Content is protected !!