तरुण भारत

राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने प्रत्येकी 10,000 ची मदत देणार – विजय वडेट्टीवार

प्रतिनिधी / सांगली

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासह राज्यांमध्ये महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये केली. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते आले होते.

Advertisements

त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झाल्याने महापूर आला. राज्य शासनाच्या वतीने सर्व पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा हजारांची मदत देण्यात येणार असून याबाबत बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. असेही त्यांनी सांगितले. दरम्यान पुरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू, पाच किलो तूर डाळ आणि पाच लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार असल्याची माहिती अन्न व पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी यावेळी बोलताना दिली.

Related Stories

सांगली : माणुसकी फाउंडेशनतर्फे ऑक्सिजन मशीनचे वाटप

triratna

सांगली : महापालिकेच्या दारात महिलांनी ओतले ड्रेनेजचे पाणी

triratna

फास्टॅग नसणारे वाहन फास्टॅगच्या लेनमध्ये आल्यास दुप्पट टोल

triratna

सातारा जिल्ह्याची चिंता वाढली; दिवसभरात 47 बाधित

triratna

सांगली : शांतिनिकेतनच्या भाग्यश्री पाटील हिची राष्ट्रीय कला उत्सवात निवड

triratna

शहरात जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी

Patil_p
error: Content is protected !!