तरुण भारत

फार्मा उद्योगाची उलाढाल 130 अब्ज डॉलर्सवर पोहचणार

सध्याची उलाढाल 42 अब्ज डॉलर्सची

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

भारतीय फार्मास्युटिकल उद्योगाची उलाढाल 2030 पर्यंत 130 अब्ज डॉलर्सवर पोहोचणार असल्याचा अंदाज डॉक्टर रेड्डी लॅबरोटरीचे चेअरमन के. सतीश रेड्डी यांनी नुकताच वर्तवला आहे.

या उद्योगाची सध्याची उलाढाल ही अंदाजे 42 अब्ज डॉलर्सच्या घरात असून औषधांच्या देशातील विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसत असून औषधांच्या निर्यातीतही चांगली सुधारणा दिसते आहे. एकंदर औषध विक्रीचा आढावा घेतला असता या उद्योगाची उलाढाल येत्या काळामध्ये तीनपट वाढणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

साधारणपणे 120 ते 130 अब्ज डॉलर्सच्या उलाढालीचा हा व्यवसाय 2030 पर्यंत होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

येणाऱया दशकामध्ये औषध उद्योगाला आपला विस्तार आणि विकास अधिक नेटाने करता येणार आहे. सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेमुळे औषध उद्योगाला सवलतीचा लाभ उठवता येणार आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये औषध उद्योगाने चांगली कामगिरी निभावली आहे. कोरोनासंबंधीत विविध औषधे असतील किंवा साधनांना मोठय़ा प्रमाणामध्ये ग्राहकांनी मागणी नोंदवली असल्याचे दिसून आले आहे.

Related Stories

ऍपलची महसूल कमाई 64.7 अब्ज डॉलर्सवर

Patil_p

नफा वसुलीमुळे सेन्सेक्सची घसरण

Patil_p

ऑक्टोबरमध्ये पेट्रोलच्या मागणीत वाढच

Patil_p

डिजिटल अर्थव्यवस्था उद्योग क्षेत्राला कलाटणी देणारी

Patil_p

स्टेट बँकेचा नफा 55 टक्क्यांनी वाढला

Patil_p

पाच वर्षांत युनिकॉर्न स्टार्टअप संख्या 10 पटीने वाढली

Patil_p
error: Content is protected !!