तरुण भारत

‘महिंद्रा’ने सादर केली नवी ‘बोलेरो निओ’

किंमत 8 लाखावर- डिझाइन,  प्रगत तंत्रज्ञानासह सज्ज

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक आणि संख्येनुसार जगातील सर्वात मोठी ट्रक्टर कंपनी असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने ‘बोलेरो निओ’ ही गाडी सादर करत आपल्या बोलेरो या अत्यंत यशस्वी अशा एसयुव्ही श्रेणीमध्ये नव्याने भर घातली. भारतात सर्वत्र महिंद्राच्या वितरकांकडे नवीन ‘बोलेरो निओ’ची ‘एन4’ या प्रकारातील मॉडेलची किंमत 8.48 लाख रुपये (एक्स शोरुम ऑल इंडिया) इतकी आहे.

यासंदर्भात ‘एम अँड एम’च्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाक्रा म्हणाले, बोलेरो ब्रँडला नि÷ावान ग्राहकवर्ग मोठय़ा संख्येने लाभला आहे. तसेच या गाडीने दोन दशकांहून अधिक काळ भारतीय रस्त्यांवर राज्य केले आहे. गाडीचे डिझाईन, तिची कामगिरी व तिच्यामधील प्रगत अभियांत्रिकी ही वैशिष्टय़े बोलेरोच्या मूळ गुणसूत्रांशी व्यवस्थित जुळतात. त्यातून हे मॉडेल धाडसी व निर्भय अशा तरुणांसाठी उपयुक्त ठरते आहे.

बोलेरो निओची वैशिष्टय़े

@क्लासिक बोलेरोची आकृती आणि त्यामध्ये आधुनिक, अतुलनीय, दखल घेण्याजोगे डिझाईन, प्रिमियम इटालियन डिझाईन इंटिरियर आणि आरामदायीपणा, सोयीसुविधा व कनेक्ट राहण्यासाठीची वैशिष्टय़े.

@73.5 किलोवॅट (100 बीएचपी) शक्ती आणि 260 एनएम टॉर्क देणाऱया एमहॉक 100 इंजिनची दमदार कामगिरी.

@स्कॉर्पिओ व थार या मॉडेल्ससाठी वापरण्यात येणाऱया ‘थर्ड जनरेशन चॅसिस’वरील बांधणीमुळे दणकटपणा व कोठेही जाण्याची क्षमता.

@मल्टी टेरेन टेक्नॉलॉजी (एमटीटी).

@उल्लेखनीय सुरक्षा यंत्रणा आणि किमतीतही कमी, देखभालीचा कमी खर्च.

Related Stories

हय़ुंदाई पेटाची विक्री पाच लाखाच्या घरात

Patil_p

रेनॉ-निस्सानचा काही प्लांट तुर्तास बंद

Amit Kulkarni

इलेक्ट्रिक दुचाकीचे दहा लाख विक्रीचे ध्येय अडचणीत

Patil_p

गुगल असिस्टंटसह नवी होंडा सिटी सादर

Patil_p

दमदार फिचर्ससोबत हिरोची ‘एक्स्ट्रीम 200 एस’ दाखल

Omkar B

मारुती आल्टोची दुसरी दशकपूर्ती उत्साहात

Patil_p
error: Content is protected !!