तरुण भारत

आयफोन -13 25 वॅट फास्ट चार्जिंगसह बाजारात येणार

नवी दिल्ली

 आयफोन निर्मितीतील दिग्गज कंपनी ऍपल आपला आयफोन-13 बाजारात आणण्याची तयारी करत आहे. 25 वॅट फास्ट चार्जिंगच्या सुविधेसह सदरचा फोन सादर होणार आहे.

Advertisements

सदरचा आयफोन-13 सप्टेंबरमध्ये दाखल केला जाणार असल्याची माहिती ऍपल कंपनीने दिली असली तरी याबाबत अधिकृत घोषणा मात्र कंपनीने केलेली नाही. मात्र सदरचा फोन हा वेगवान चार्ज होणारा असून आयफोन 12ची सुधारीत आवृत्ती असणार आहे. आयफोन 12 हा 20 वॅट फास्ट चार्जिंग सुविधेसह बाजारात दाखल झाला होता. 2019 मध्ये कंपनीने 18 वॅट युएसबी ऍडप्टरसह आयफोन-11 व आयफोन 11 प्रो सादर केले होते. त्यानंतर 2020 मध्ये ऍपलने 20 वॅट युएसबी ऍडाप्टरसह फोन बाजारात दाखल केले होते. आता कंपनी 25 वॅट फास्ट चार्जिंगचा आयफोन-13 दाखल करणार आहे.

Related Stories

2022 मध्ये ओएलइडी फीचर्सचे स्मार्टफोन लोकप्रिय

Patil_p

नोकियाचे दोन नवे फोन बाजारात

Patil_p

‘विवोचा व्ही 21’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p

सॅमसंग गॅलेक्सी एम 11 चे सादरीकरण

tarunbharat

सॅमसंग ‘गॅलक्सी एम 32’ 21 जूनला बाजारात

Patil_p

2021 मध्ये सॅमसंगचे 3 फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p
error: Content is protected !!