तरुण भारत

ठाण्यातील तरुण उद्योजक बापूजी यांचा चिपळूणवासीयांना मदतीचा हात


रत्नागिरी /प्रतिनिधी :


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पूरस्थितीमुळे शेकडो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यामध्ये ना भांडी राहिली नाही कपडे तर काहींचे संसार चिखलमय झाले. या चिपळूणवासीयांना नव्याने उभारी देण्यासाठी रत्नागिरीतील शेकडो संस्था, दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. तर दुसरीकडे थेट ठाण्यातून नवीन कपडे घेऊन एक टेम्पो सोमवारी चिपळूणला रवाना झाला आहे.

Advertisements

ठाण्यातील तरुण उद्योजक आणि श्रीजी मोबाईल टेलिकॉम चे मालक बापूजी यांच्यामार्फत ही मदत पाठवण्यात आली आहे.
सोशल मीडियावर चिपळूणच्या पूरस्थितीबाबत माहिती मिळताच बापूजी यांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्व नवीन कपड्यांची खरेदी करून त्याचे नीट पॅकिंग करून चिपळूण कडे रवाना केले आहे आणखीन काही मदत ते पाठवणार असून महत्वाचे म्हणजे त्यांनी रुग्णांसाठी २ ऑक्सीजन concentrator ही पाठवले आहे. श्रीजी मोबाईल टेलिकॉम चे बापूजी यांच्या या सामाजिक बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Related Stories

जिह्यात 7 हजाराहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त

Patil_p

पालशेतमध्ये मुंबईतील सोमनाथ मच्छीमार बोटीला जलसमाधी

Omkar B

जिल्हय़ात यावर्षी 53 हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

Patil_p

जिह्यात कोरोनाचे 18 नवे बाधित

Patil_p

आंतरजातीय विवाहितांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतिक्षा निकाली

triratna

जिल्हय़ात धुवाधार पाऊस!

Patil_p
error: Content is protected !!