तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेत नवे रूग्ण प्रथमच पाचशेच्याखाली, मृत्यू 13

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 13 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 355 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 343 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 10 हजार 233 झाली आहे. रविवारच्या तुलनेत मृत्यूसंख्येत घट झाली आहे. सक्रीय रूग्णसंख्या घटत आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेत प्रथमच नवे रूग्ण पाचशेच्याखाली आले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने 13 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 352 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 894, नगरपालिका क्षेत्रात 750, शहरात 1 हजार 142 तर अन्य 566 आहेत. दिवसभरात 1 हजार 343 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 78 हजार 247 झाली आहे. गेल्या 24 तासांत 355 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 7, भुदरगड 4, चंदगड 2, गडहिंग्लज 5, गगनबावडा 0, हातकणंगले 43, कागल 13, करवीर 66, पन्हाळा 4, राधानगरी 8, शाहूवाडी 1, शिरोळ 20, नगरपालिका क्षेत्रात 27, कोल्हापुरात 150 तर अन्य 5 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 93 हजार 832 झाली आहे.

कर्नाटकातील एकाचा तर कोल्हापुरातील चौघांचा कोरोनाने मृत्यू

परजिल्ह्यातील बेळगाव येथील एकाचा तर कोल्हापूर शहरातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरात सोमवारी 150 नवे रूग्ण दिसून आले कोरोनाने मृत्यू झालेल्यांत रामानंदनगर, लक्षतीर्थ वसाहत, देवकर पाणंद, राजोपाध्येनगर येथील व्यक्तींचा समावेश आहे.

साडेचार महिन्यांनंतर प्रथमच तालुकानिहाय रूग्णसंख्या दुहेरीत

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मार्चमध्ये सुरू झाली. पण जुलैअखेरीस सोमवारी प्रथमच तालुकास्तरावर नवी रूग्णसंख्या एकेरी, दुहेरीत नोंद झाली. साधारणतः आजरा 7, भुदरगड 4, चंदगड 2, गडहिंग्लज 5, गगनबावडा 0, पन्हाळा 4, राधानगरी 8, शाहूवाडी 1 येथे एकेरी रूग्ण दाखल झाले तर हातकणंगले 43, कागल 13, करवीर 66, शिरोळमध्ये 20 नव्या रूग्णांची नोंद झाली. नगर पालिकांत 27 तर इतर 5 रूग्णांची नोंद झाली आहे.

Advertisements

Related Stories

कुंभोजच्या सर्वांगीण विकासासाठी दहा लाखाचा निधी : आमदार राजू आवळे

triratna

कोल्हापूर : सत्ताकारणाचा ट्रेलर दाखवताना गोकुळ ‘ब्रँड’ चा नावलैकीकही राखा!

triratna

कोपार्डे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार

triratna

सततच्या आजारास कंटाळून तरुणाची आत्महत्या

triratna

हातकणंगले तालुक्यात 344. 75 मिलिमीटर पावसाची नोंद

triratna

कोल्हापूर : उद्योगपती शामराव चौगुले यांचे निधन

triratna
error: Content is protected !!