तरुण भारत

आघाडी न झाल्यास पुतण्याला धडा शिकविणार

शिवपाल यादव यांची तयारी ः उत्तरप्रदेशात पुढील वर्षी निवडणूक

वृत्तसंस्था / कानपूर

Advertisements

उत्तरप्रदेशा विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वांच्या नजरा काका-पुतण्याच्या संभाव्या आघाडीवर केंद्रीत झाल्या आहेत. काका आघाडीसाठी तयार असला तरीही पुतण्याकडून याचे कुठलेच संकेत मिळत नसल्याचे चित्र आहे. काका-पुतण्यादरम्यान आघाडी न झाल्यास प्रगतिशील समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांना नुकसान पोहोचविण्याच्या तयारीत आहे. आपण किंगमेकरच्या भूमिकेत असू असा दावा शिवपाल यादव यांच्या पक्षाने केला आहे.

प्रगतिशील समाजवादी पक्षाचे प्रमुख शिवपाल सिंग यादव हे दीर्घकाळापासून समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सप आणि प्रसप विधानसभा निवडणूक एकत्रित लढवतील अशी त्यांना अपेक्षा होती. पण विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाही सप अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून आघाडीचे संकेत मिळत नसल्याने शिवपाल यांची अस्वस्थता वाढली आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांना ही आघाडी व्हावी असे वाटत आहे.

समान विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत आघाडी करण्यास तयार असल्याचे शिवपाल यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. समाजवादी पक्षाकडून आघाडीचे संकेत मिळत नसल्याने आम्ही स्बळाची तयारी सुरू केल्याचे प्रसपचे सचिव आशिष चौबे यांनी सांगितले आहे.

403 उमेदवार उभे करणार

प्रसप काही कौटुंबिक मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. या उमेदवारांची नावे पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव करणार आहेत. बूथस्तरावर पक्षाची तयारी सुरु आहे. पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेत मोठय़ा संख्येत युवा जोडले जात असल्याचा दावा चौबे यांनी केला आहे.

कुणाचे होणार नुकसान?

उत्तरप्रदेशचे राजकारण जातीय समीकरणांवर आधारित असल्याचे मानण्यात येते. विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि प्रगतिशील समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी न झाल्यास सर्वाधिक नुकसान सपचेच होणार आहे. सप आणि प्रसप यांची हक्काची मतपेढी एकच आहे. अशा स्थितीत शिवपाल यांचा पक्ष समाजवादी पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडू शकतो, याचा लाभ अन्य राजकीय पक्षांना मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

पंतप्रधान मोदींची नेपाळ पंतप्रधानांशी चर्चा

Patil_p

‘ओएमजी’ यांचे गुढगे दिसत आहेत म्हणत प्रियांका गांधींनी साधला भाजपवर निशाणा

Abhijeet Shinde

आगामी विधानसभा समविचारी पक्षांसोबत लढणार

datta jadhav

पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

भारतात कोरोना रुग्णांची संख्या साडेपाच लाखाच्या उंबरठ्यावर

datta jadhav

फायझर कंपनीची लस मुलांसाठी सुरक्षित

Patil_p
error: Content is protected !!