तरुण भारत

व्हिन्सेन्ट 3 सुवर्ण जिंकणारा पहिला स्कीट शूटर

2008 व 2012 मध्येही सर्वोच्च कामगिरी, महिला गटात ऍम्बरला विजेतेपद

अमेरिकेचा व्हिन्सेन्ट हॅन्कॉक ऑलिम्पिक इतिहासात 3 सुवर्ण जिंकणारा पहिलाच स्कीट शूटर ठरला. सोमवारी असाका शुटिंग रेंजवर त्याने आपल्या कारकिर्दीत स्कीटमधील तिसरे सुवर्ण जिंकले. यापूर्वी 2008 व 2012 मध्ये त्याने दोनवेळा सुवर्ण जिंकले. 2016 रिओ डे जानेरिओमध्ये तो सहभागी होता. मात्र, त्यावेळी त्याला हॅट्ट्रिक साधण्यात यश आले नव्हते. ती कसर त्याने येथे टोकियोत भरुन काढली.

Advertisements

महिलांच्या गटात ऍम्बर इंग्लिशने इटलीच्या विद्यमान विजेत्या डायना बॅकोसीला पराभवाचा धक्का दिला. नंतर तासाभराच्या अंतराने हॅन्कॉकने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने 60 पैकी 59 वेळा टार्गेट हिट करत डेन्मार्कच्या जेस्पर हॅनेनला मात दिली. 38 वर्षीय हॅन्कॉक फोर्ट वर्थ, टेक्सासचा असून त्याची येथील कामगिरी अव्वल दर्जाची राहिली. कुवेतच्या अब्दुल्लाह अल-रशिदीने सलग दुसऱयांदा कांस्य जिंकण्याचा पराक्रम गाजवला. यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने स्वतंत्र ऑलिम्पिक ऍथलिट म्हणून सहभागी होत पहिले कांस्य जिंकले होते.

महिला गटात जागतिक मानांकनात 24 व्या स्थानी असलेल्या ऍम्बरने 60 पैकी 56 वेळा टार्गेट साध्य केले आणि सुवर्णपदक मिळवले. बॅकोसीने 50 पैकी 47 वेळा टार्गेट हिट करत अंतिम फेरी गाठली. मात्र, फायनलमध्ये तिसऱया प्रयत्नात ती चुकली आणि ऑलिम्पिक चॅम्पियन होण्याची तिची संधीही हुकली. क्वॉलिफाईंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारी चीनची वेई मेंग कांस्यपदकाची मानकरी ठरली.

महिलांच्या फायनलमध्ये जागतिक स्तरावरील 6 अव्वल दर्जाच्या स्कीट शूटर्सपैकी 4 शूटर्स समाविष्ट होते. यात बॅकोसी, वेई यांच्यासह जर्मनीची नॅदिने व रशियाची नतालिया यांचाही समावेश राहिला. ब्रिटनची अव्वलमानांकित ऍम्बर हिल कोरोनाबाधित असल्याने टोकियोला येऊ शकली नाही. अगदी टोकियोला प्रयाण करण्याच्या दिवशीच तिचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.

सोमवारी वेईने क्वॉलिफाईंगमध्ये नवा विक्रम प्रस्थापित करताना 125 पैकी 124 वेळा टार्गेट हिट केले. पण, फायनलमध्ये 14 पैकी 2 टार्गेट चुकल्याने ती बॅकोसी व ऍम्बर इंग्लिश यांच्या तुलनेत मागे फेकली गेली.

ऍम्बर इंग्लिश हिला शुटिंगचा वारसा कुटुंबाकडूनच आला आहे. तिचे वडील मायकल यांनी 1982 ते 1987 या कालावधीत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 4 कांस्यपदके जिंकले असून तिची आई व काकू देखील राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटर्स राहिले आहेत. 38 वर्षीय ऍम्बर इंग्लिश 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिसरी आली आणि त्यानंतर मागील 3 वर्षात आयएसएसएफ जागतिक मानांकन यादीत ती सातव्या स्थानापर्यंत पोहोचली.

पुरुष गटातील हँकॉक देखील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम स्कीट शूटर्सपैकी एक राहिला असून त्याने आजवर 2 ऑलिम्पिक सुवर्ण, 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप व 6 विश्वचषक इव्हेंट जिंकले आहेत. मेक्सिकोत 2015 वर्ल्डकपमध्ये तर तो प्रत्येक टार्गेट हिट करणारा अमेरिकेचा पहिलाच स्कीट शूटरही ठरला होता. रिओमध्ये मात्र तो बहरात नव्हता आणि तेथे त्याला 15 व्या स्थानी समाधान मानावे लागले होते.

Related Stories

एटीपी क्रमवारीत व्हेरेव्ह चौथ्या स्थानावर

Patil_p

सत्यवर्त, सुमित उपांत्यपूर्व फेरीत, धनकर पराभूत

Amit Kulkarni

एक सामना नव्हे, वर्ल्डकप जिंकणे हे आपले लक्ष्य!

Patil_p

इंग्लंडच्या अष्टपैलू लिव्हिंगस्टोनला दुखापत

Patil_p

क्विटोव्हा, सित्सिपस पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

ज्येष्ठ क्रिकेटपटु बाबू खानापूरकर यांचे दुःखद निधन

Rohan_P
error: Content is protected !!