तरुण भारत

भविष्यात ‘एआय’ शिक्षक देणार गुण

अचूक मूल्यांकन करून गुण देणार, चुकांवर विस्तृत फीडबॅक मिळणार

मार्च महिन्यात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत कोड इन प्लेस ऑनलाइन प्रोग्राममध्ये 148 देशांच्या 1200 हून अधिक जणांनी नोंदणी केली होती. कॉम्प्युटर प्रोग्रामिंगच्या फंडामेंटलशी संबंधित या अभ्यासक्रमानंतर परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचे मूल्यांकन एखाद्या शिक्षकाने नव्हे तर एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) प्रोग्रामने केले होते.

Advertisements

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची ही सिस्टीम ई-एज्युकेशनच्या नव्या भविष्याच्या दिशेने संकेत देणारी आहे. ही सिस्टीम अपेक्षेहून किती तरी अधिक चांगल्याप्रकारे काम करत आहे. या सिस्टीमने 1600 फीडबॅक दिले, यातील 97.9 टक्के फीडबॅकवर विद्यार्थ्यांनी सहमती दर्शविली आहे. तर यापूर्वी मानवी शिक्षकाच्या फीडबॅकवर 96.7 टक्के सहमती होती अशी माहिती एआय संशोधक प्राध्यापक चेल्सी फिन यांनी दिली आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळी पद्धत

शिक्षक वर्गात एकच विषय 35 वेगवेगळय़ा पद्धतींनी शिकवू शकत नाही, पण एआयद्वारे हे शक्य आहे. एआय प्रत्येक विद्यार्थ्याच्या वर्तनाचे अध्ययन करतो, त्यानंतर या माहितीद्वारे विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या अनुभवाला वैयक्तिक स्वरुप मिळवून देतो.

एडप्टिव्ह लर्निंग

विद्यार्थी एखाद्या मूलभूत संकल्पनेत कमकुवत असल्यास एआय याच्याशी संबंधित व्हिडिओज आणि रीडिंग मटेरियल वारंवार पाठवितो, जेणेकरून विद्यार्थी संबंधित संकल्पना चांगल्याप्रकारे जाणून घेऊ शकेल.

ऑटोमेटेड ग्रेडिंग अन् फीडबॅक

एआय उत्तरपत्रिकांच्या तपासणीत मदत करू शकते, यातून विद्यार्थ्यांना त्वरित फीडबॅक मिळणार आहे. तसेच शिक्षकांना संशोधन करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

वारंवार होणाऱया चुका

एआय सिस्टीम बहुतांश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची पद्धत आहे. ही सिस्टीम किरकोळ चुका देखील ओळखते, त्यांच्या समस्या सांगते. कोडिंगशी संबंधित विशिष्ट चुका आणि वारंवार होणाऱया चुकांना ओळखून प्रशिक्षकांना कुठल्या विद्यार्थ्याला कसली मदत हवी आहे हे उत्तमप्रकारे समजविण्यास मदत करू शकते असे उद्गार स्टॅनफोर्डच्या या ऑनलाईन प्रोग्रामचे निरीक्षण करणाऱया प्राध्यापक क्रिस पाइप यांनी काढले आहेत.

Related Stories

फेब्रुवारीमध्ये पुन्हा बँक कर्मचाऱ्यांचा संप

Amit Kulkarni

उत्तर प्रदेशात विवाहनोंदणी अनिवार्य

Patil_p

नौदलाचे मिग-29 के विमान अरबी समुद्रात दुर्घटनाग्रस्त

datta jadhav

हरियाणात शेतकऱ्यांची महापंचायत

Patil_p

शेअर बाजारात ‘कोरोना इफेक्ट’

Patil_p

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीविरोधातील याचिकेवर बुधवारी सुनावणी

datta jadhav
error: Content is protected !!