तरुण भारत

‘वन-लेग स्टान्स’वर जिंकले वेटलिफ्ंटगचे सुवर्ण!

चीनच्या लि फॅबियनचा पराक्रम, नवा ऑलिम्पिक विक्रमही प्रस्थापित

चीनचा लि फॅबियन हा 61 किलोग्रॅम वजनगटातील अव्वल दर्जाचा वेटलिफ्टर. सोमवारी त्याने आपल्या कारकिर्दीत आणखी एकदा फ्लेमिंगो स्टान्स घेत वन लेग स्टान्सवर सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला. अर्थात, काही दुर्बलता आहे म्हणून नव्हे तर ही त्याची स्पेशालिटी मुव्ह असून असे त्याने यापूर्वी अनेकदा केले आहे. सध्या त्याच्या खात्यावर 2 ऑलिम्पिक रेकॉर्ड व 1 सुवर्णपदक आहे.

Advertisements

सोमवारी फॅबियनने क्लीन व जर्कचे एकूण 166 किलोग्रॅम वजन उचलण्याचा पराक्रम साधला. हे प्रमाण त्याच्या वजनाच्या जवळपास तिप्पट भरते. फॅबियनने आपला उजवा पाय जमिनीवरुन वर उचलत एका पायावर भार घेतला आणि यशस्वीरित्या लिफ्ट पूर्ण केले. त्याने येथेच 172 किलोग्रॅमचे लिफ्ट करत नवा ऑलिम्पिक विक्रम प्रस्थापित केला. त्याचा स्नॅच आणि जर्क व क्लीनमधील 313 किलोग्रॅमचा हा नवा ऑलिम्पिक विक्रमही ठरला आहे.

एका पायावर भार पेलत यशस्वी लिफ्ट करण्यात तो सातत्य राखत आला असला तरी आपण शो-ऑफसाठी हे करत नाही, असे त्याने यावेळी स्पष्ट केले. चीनने वेटलिफ्ंिटगमध्ये आणखी 2 सुवर्णपदके जिंकली असून चेन लियूनने पुरुषांच्या 67 किलोग्रॅम वजनगटात तर होऊ झिहुईने महिलांच्या 49 किलोग्रॅम वजनगटात नव्या ऑलिम्पिक विक्रमासह अव्वलस्थान पटकावले.

टोकियोत चीनचे सर्वही 8 वेटलिफ्टर्स सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले गेले असून ऐतिहासिक स्वीप नोंदवण्याचा त्यांचा निर्धार आहे. उत्तर कोरियाने पूर्ण ताकदीचा संघ पाठवलेला नाही आणि अन्य काही राष्ट्रांनी छोटी पथके पाठवली, ही बाब चीनसाठी या क्रीडा प्रकारात पथ्यावर पडणारी ठरली आहे.

Related Stories

प्रसिद्ध कृष्णा 23 मे रोजी मुंबईला रवाना

Patil_p

अमेरिकन टेनिस स्पर्धेत अशियाई टेनिसपटूंना कसरत

Patil_p

मुगुरुझा उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

गोकुळम केरळा महिला संघ उपांत्य फेरीत

Patil_p

भारतीय युवा संघाची उपांत्य फेरीत धडक

Patil_p

स्पेनच्या राफेल नदालचा पराक्रम

Patil_p
error: Content is protected !!