तरुण भारत

आपत्तीग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे

प्रतिनिधी/ सातारा

अतिवृष्टीमुळे वाई तालुक्यातील कोंढावळेसह पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर,  हुंबरळी आदी जिल्हय़ातील अनेक ठिकाणी भूस्खलन तसेच दरडी कोसळून जीवीत व वित्त हानी मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. अनेक घरं बेचिराख झाली असून ही कुटुंब बेघर झाली आहे. त्यामुळे या कुटुंबांना मदतीबरोबरच त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

Advertisements

  सातारा जिल्हय़ातील आपत्तीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱयावर पेंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आले होते. त्यावेळी साताऱयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, अप्पा तुपे, श्रीकांत निकाळजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, राज्यात पावसाने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या पहाडांनी आपल्याला आधार दिला. ज्या पहाडाजवळ पिढय़ा न् पिढय़ा रहात होतो. त्याच पहाडांनी आपल्यावर घात केला आहे. आपत्तीमुळे मृत्यू झालेल्यांना शासनाच्यावतीने पाच लाख मिळणार आहेत. केंद्र सरकारच्यावतीने दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. आमची मागणी अशी आहे की डेंजर झोनमध्ये जी गावे आहेत. त्या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे. त्याकरता राज्य सरकारने समिती नेमावी, असे सांगितले.

कोंढावळे ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करा

कोंढावळे ग्रामस्थांचे तात्पुरते पुनवर्सन करण्यात यावे. याबाबत मी जिल्हधिकाऱयांशी बोलणार आहे. तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याचे शेड टाकून द्यावे, अशी मागणी त्या लोकांची आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. राज्य सरकारकडून मदत मिळावी. महाराष्ट्रात 149 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलेला आहे. दरडी कोसळण्याचा पहिलाच मोठा प्रकार आहे. महाडला भेट दिली. चिपळूणलाही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. तेथील व्यापाऱयांनी आपले गाऱहाणे मांडले आहे. शासनाने या व्यापाऱयांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पॅकेज द्यावे. त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु झाला पाहिजे. त्याचबरोबर ज्यांच्या घरांना तडे गेलेले आहे. त्यांना सरकारने मदत करावी. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जखमींना मदत करावी, असेही आठवले यांनी सांगितले.

Related Stories

सातारा हिल मॅरेथॉनचा उद्या होणार थरार!

Patil_p

शिरोळ येथे ट्रॅक्टर वरून पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Abhijeet Shinde

नारायण राणेंच्या भेटीसाठी किरीट सोमय्या दिल्लीत

Abhijeet Shinde

मुंबई लोकल सर्वांसाठी लवकरच सुरू करणार : ठाकरे सरकारने दिले संकेत

Rohan_P

फळविक्रेत्यांना नियम लागणार कधी ?

Patil_p

औरंगाबादमध्ये प्रत्येक शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन

Rohan_P
error: Content is protected !!