तरुण भारत

स्पेनचा जुआन गोंझालेज हैदराबाद एफसीला करारबद्ध

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

हैदराबाद एफसीने यंदाच्या आयएसएल फुटबॉल मोसमात स्पेनचा डिफेंडर जुआन आंतोनियो गोंझालेज याच्याशी करार केला आहे. 34 वर्षीय जुआन हा मागील पाच फुटबॉल मोसम बेंगलोर एफसीसाठी खेळत होता.

Advertisements

स्पेनच्या दिपोर्तिवा ला-कोरूना संघाला खेळून जुआनने आपल्या सीनियरस्तरीय फुटबॉलची सुरूवात केली. त्यानंतर तो 2011 मध्ये जर्मनीला जाण्यापूर्वी रियल माद्रीद कास्तिला या संघाला खेळला. बुंदेसलीगामध्ये जुआन फॉर्च्युना दुसेलडर्फ या संघासाठी खेळला. भारतात 2016 मध्ये येण्यापूर्वी तो हंगेरी, अमेरिका आणि स्पेनमध्ये प्रोफेशनल फुटबॉल खेळला आहे. भारतात तो बेंगलोर एफसीला खेळताना तो 2017 मध्ये फेडरेशन चषक आणि 2018 मध्ये सुपर कप आणि आयएसएल विजेत्या संघाचा सदस्य राहिला आहे. जुआन हा उच्च दर्जाचा आणि अनुभवी डिफेंडर असल्याचे हैदराबादचे प्रशिक्षक मानोलो मार्कीझ म्हणाले. पाच फुटबॉल मोसम भारतात खेळल्याने त्याला भारतीय फुटबॉलचा चांगला अनुभव असल्याचे मानोलो म्हणाले. आयएसएलमध्ये 71 सामने खेळलेल्या जुआनच्या नावावर पाच गोलांची नोंद आहे. बार्थोलॉमियाँव ओगबेचे आणि एदू गार्सिया यांच्यानंतर जुआन हा हैदराबाद एफसीशी करार करणारा तिसरा विदेशी फुटबॉलपटू आहे.

Related Stories

मुरगाव तालुक्याला जायकाचे पाणी पुरवण्याचे सा.बां.खा. मंत्र्यांचे आश्वासन

Patil_p

वाळके खुनाचे ‘मायनिंग कनेक्शन’?

Patil_p

धारगळ येथील आयुष्य इस्पितळ आणि महाविद्यालय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम आठ महिन्यात पूर्णत्वास : केंद्रीय मंञी श्रीपाद भाऊ नाईक

Amit Kulkarni

गणेशोत्सव मंडळांनी कोरोनासंबंधी जनजागृती करावी

Patil_p

सरकारच अमली पदार्थ व्यवसायात

Omkar B

राज्यात पावसाचा जोर कायम

Omkar B
error: Content is protected !!