तरुण भारत

महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहेत, त्यांनी केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा – संजय राऊत


मुंबई \ ऑनलाईन टीम

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी चिपळूण, महाडचा दौरा करत मदतीची घोषणा केली. यावरुन राजकीय श्रेयवादाची लढाई सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहेत. त्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. त्यांनी येताना दोन हजार कोटींचा चेक केंद्राकडून घेऊन यावा, असा निशाणा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर साधला.

संजय राऊत आज माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, महाराष्ट्र सरकार हे आपल्या जनतेला सहाय्य आणि मदत करण्यास सक्षम आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत. पण केंद्राची जबाबदारी आहे. महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देत आहे. विशेषत: मुंबई. आता आम्ही तो काय हिशोब मागायला बसलो नाही आहोत. पण जबाबदारी केंद्राचीसुद्ध आहे. केंद्र आमचा बाप आहे असा विरोधकांना टोला लगावत केंद्राची मदत नक्की स्वीकारली जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचे काही मंत्री केंद्रामध्ये आहेत. त्यांनी येताना केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा. नरेंद्र मोदींच्या सहीचा चेक मिळाला तर आम्ही त्याचं वाजत गाजत स्वागत करू. कोकण, सातारा, सांगलीच्या लोकांना देऊ. कारण एकएक पै महत्त्वाचा आहे, असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला.

Related Stories

यवतमाळ : एसटी बसच्या भीषण अपघातात 4 मजूर ठार, 15 जखमी

datta jadhav

सातारा : नगरसेविका कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

”नवनीत राणा यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं”

Abhijeet Shinde

खोटे बोलून रस्त्यावर फिरणाऱयांना युवकांना चोप

Patil_p

…मात्र, फारशा अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही : प्रवीण दरेकर

Rohan_P

शाहुवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने चिनी वस्तूंचा निषेध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!