तरुण भारत

चीनचा WHO विरोधात आक्रमक पवित्रा

ऑनलाईन टीम / बीजिंग :   

कोरोनाचे उगमस्थान शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्यांदा चीन आणि वुहानच्या प्रयोगशाळांची तपासणी करण्याचा प्रस्ताव ठेवला. चीनने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. जे चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू पसरल्याचा दावा करतात, त्यांनी अमेरिकेतील फोर्ट डेट्रिक जैविक प्रयोगशाळेची चौकशी करावी, असे चीनने म्हटले आहे.  

Advertisements

वुहानची प्रयोगशाळाच कोरोनाचे उगमस्थान असल्याचा आरोप अनेक देशांनी केला होता. त्यानंतर डब्लूएचओच्या पथकाने वुहानमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र, त्यामधून पुरेशी माहिती हाती आली नाही. त्यामुळे डब्लूएचओने पुन्हा एकदा वुहानच्या प्रयोगशाळेची तपासणी करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले, वुहानच्या प्रयोगशाळांची चौकशी करण्यापेक्षा डब्लूएचओने अमेरिकेच्या फोर्ट डेट्रिकला जावे. अमेरिकेनेही त्यांना फोर्ट डेट्रिक लॅबच्या चौकशीसाठी बोलवावे. त्यामुळे सत्य जगासमोर येईल, असेही लिजियान म्हणाले.

Related Stories

डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच घातला मास्क

datta jadhav

जॉर्जियातील फेर मतमोजणीत बायडेन विजयी

datta jadhav

जगातील सर्वात लांब कार हेलिपॅडपासून स्वीमिंग पूलाची सुविधा

Patil_p

टॉवरवर आलिशान डिनरची तयारी

Patil_p

अलास्कात दोन विमानांची हवेत धडक; 7 ठार

datta jadhav

अमेरिकेत आणखी एका कृष्णवर्णीयाच्या मृत्यूवरून वाद

Patil_p
error: Content is protected !!