तरुण भारत

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ! आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ऑनलाईन टीम / मुंबई : 


पॉर्न फिल्म प्रकरणात कोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज कुंद्राला 19 जुलैच्या रात्री उशिरा गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राज यांच्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र कोर्टाने ही विनंती मान्य केली नाही. यापूर्वी कोर्टाने राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली जाईल, असा आदेश दिला होता. यानंतर मुंबई पोलिसांची टीमही राज कुंद्रा यांच्यासह त्यांच्या घरी पोहोचली आणि घराची झडती घेतली. या प्रकरणात राज यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची देखील चौकशी करण्यात आली.

Advertisements


दरम्यान, संबंधित पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणामध्ये राज कुंद्रा मुख्य आरोपी आहे. राज कुंद्राच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्याच आधारावर पोलिसांनी रायन थार्प या व्यक्तीला अटक केली आहे. रायन थार्प देखील राज कुंद्राशी थेट संबंधित असून पॉर्न फिल्म निर्मितीमध्ये त्याचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.


राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे यालाही रायगडमधून अटक करण्यात आली आहे. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा अतिशय जवळचा व्यक्ती आहे. रायनने अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे.
.
राज कुंद्रा यांचे माजी सहाय्यक उमेश कामत यांनी त्यांचे नाव सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा यांच्या कार्यालयातील अश्लिल क्लिप्स आणि ईमेल यांचा समावेश असलेला पुरावा हा ‘मुख्य सूत्रधार’ असल्याचे दिसून आले आहे. राज कुंद्राच्या मुंबई कार्यालयातून अश्लील सामग्री तयार केली जात होती. ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅपवर अश्लील सामग्री तयार करणे आणि प्रसारित करण्यात देखील कुंद्रा यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

अण्णासाहेब देऊळगावकर जन्मशताब्दीपूर्ती सोहळा संपन्न

Patil_p

गोविंदा।़।़… गोविंदा।़।़…

Patil_p

रहस्यमय आवाजाचा मागोवा द वास्ट ऑफ नाईट

Patil_p

प्रेमाची नवी परिभाषा सांगणारा स्टोरी ऑफ लागिरं…

Patil_p

माशुकामध्ये प्रेमाचा दिवस साजरा

Patil_p

दिल्लीत हे काय करू लागला राजकुमार राव!

Amit Kulkarni
error: Content is protected !!