तरुण भारत

कर्नाटक: भाजप विधिमंडळाची ७ वाजता बैठक, नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची होणार घोषणा

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांच्यावर मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी

बेंगळूर/प्रतिनिधी

Advertisements

बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी यांच्यावर पक्षाने मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी विधिमंडळाची बैठक घेण्यासाठी दिल्लीहून बेंगळूरला रवाना झाले आहेत. दिल्ली सोडण्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे निरीक्षक जी. किशन रेड्डी म्हणाले की, सर्व आमदारांशी बैठक होईल, तेथे गोष्टी निश्चित होतील. दुसरीकडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणूनकुणाचे नाव आहे असे विचारले असता, जी. किशन रेड्डी म्हणाले की, त्यांना माहिती नाही, आमदार त्यावर निर्णय घेतील.

बेंगळूर येथे आज सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होणार आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष यांचेही नाव पुढे येत आहे. त्याचे नाव यापूर्वीच निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीतील भाजपच्या उच्चस्तरीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की बी. एल. संतोष व्यतिरिक्त चार उपमुख्यमंत्रीही असण्याची शक्यता आहे, ते लिंगायत समुदायाचे आहेत. यासह लक्ष्मण सवदी यांना उपमुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्याचीही चर्चा आहे.

Related Stories

उद्यापासून अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू : वर्षा गायकवाड

Rohan_P

म्युकरमायकोसिस : 18 राज्यात 5424 रुग्ण

datta jadhav

गॅस सिलिंडर दरात 10 रुपयांनी कपात

Patil_p

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

Rohan_P

पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळून 20 ठार

Patil_p

महिंद्राचे ट्रक्टर्सही महागणार

Omkar B
error: Content is protected !!