तरुण भारत

सिंधुदुर्ग पूरग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज द्या- जिल्हा भाजपच्यावतीने निवेदन

बांदा/ प्रतिनिधी-

बांदा व खारेपाटण बाजारपेठेत आलेल्या पुरामुळे ९० टक्केहून अधिक दुकानातील सामान वाहून गेले. शासन स्तरावर चिपळूण, महाड, सांगली इतर ठिकाणी येथील पुरबाधित व्यापाऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे. बांदा व खारेपाटण मधील व्यापाऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. या व्यापाऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात येणाऱ्या शासकीय अध्यादेशात बांदा शहरातील व्यापाऱ्यांना सामावून घेण्यात यावे अशी मागणी जिल्हा भाजपच्या वतीने लेखी निवेदना द्वारे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी याचे कडे करण्यात आली.

Advertisements


यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परीषद अध्यक्षा संजना सावंत, माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सावंतवाडी उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, पराग गांवकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले प्रशासनाने कोणतीच कल्पना न देता पाणी सोडल्याने पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला.बांद्यात शहरात पोलीसस्थानक असताना त्यांच्या कडून पाण्याची पातळीवाढते अशी कोणतीच सूचना दिली नाही. तर बांदा पोलीस निरीक्षक शहरात पाणी आले असताना योगा करत बसले होते त्यामुळे पूर्वकल्पना न दिल्या मुळे कोणालाच आपले सामान दुसऱ्या जागी हलविता आले नाही परिणामी कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले.त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी ज्या प्रमाणे पॅकेज जाहीर होत आहे त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असावा.तर प्रशासनाने खोटे पंचनामे न करता खरोखरच ज्याचे नुकसान झाले त्याला भरघोस मदत द्यावी.तर इन्शुरन्स कंपनी व बँकांनी क्लेम साठी सहकार्य करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे केली.


जिल्ह्यात ज्याज्या ठिकाणी पुरामुळे दरडी कोसळतयामुळे नुकसानी झाली त्यात बांदा, खारेपाटण, शिरशिंगे, दोडामार्ग सह जिल्ह्यातील सर्वंच ठिकाणी रीतसर पंचनामे करावे.रस्ते ,पूल वाहून गेलीत. विशेष पॅकेज मध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश असावा जेणेकरून येथील शेतकरी, व्यापारी व छोटे व्यावसायिक याना मदत मिळेल. कृपया ज्याप्रमाणे तौक्ते वादळादरम्यान जसे पंचनामे झाले तस होता नये याची काळजी घेतली पाहिजे असे जि प अध्यक्षा संजना सावंत म्हणाल्या. आम्ही याबाबतचा प्रस्ताव तातडीने करून वरिष्ठ कडे पाठवणार असे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सांगितले

Related Stories

व्यापाऱयांचे बंड प्रशासनाच्या लसीने थंड

Patil_p

देवगडमध्ये 100 गरजूंना मोफत जेवण

NIKHIL_N

सव्वादोन लाख कुटुंबांना ‘अर्सेनिक गोळय़ा’

NIKHIL_N

दिवाकर मावळणकर यांना गोवा शासनाकडून स्टार फार्मर पुरस्कार

Ganeshprasad Gogate

जिल्हा बँकेसाठी ‘सहकार’समोर ‘परिवर्तन’चे आव्हान?

Patil_p

गृहराज्य मंत्री सतेज पाटील देणार काँग्रेस संघटनेला बळकटी

Patil_p
error: Content is protected !!