तरुण भारत

पठाण’मध्ये दीपिकाचे ऍक्शन सीन

शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात दीपिका पदूकोन ऍक्शन सीन करताना दिसून येणार आहे. दीपिका पहिल्यांदाच भारतीय रुपेरी पडद्यावर आंतरराष्ट्रीय स्तराचे ऍक्शन सीन करणार असल्याचे समजते. ‘ट्रिपल एक्स ः रिटर्न ऑफ जेंडर केज’ या हॉलिवूड चित्रपटात साकारलेले ऍक्शन सीन दीपिका आता बॉलिवूडमध्ये करताना दिसून येणार आहे. हॉलिवूडसारखा अवतार भारतीय चित्रपटात सादर करण्यासाठी दीपिका सरसावली आहे.

दीपिका सध्या ‘पठाण’साठी हाय ऑक्टेन ऍक्शन सीन चित्रित करत आहे. चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईत सुरू आहे. अभिनेत्रीने याकरता जोरदार तयारी केली आहे. पठाण चित्रपटाच्या चित्रिकरणाचा पहिला टप्पा पार पडला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबत जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे मानले जात आहे.

Advertisements

Related Stories

अभिनेता अक्षय कुमार रुग्णालयात दाखल

Rohan_P

सुनील गोडबोलेंची टाळेबंदी युक्ती ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण

Patil_p

सुशांतच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी चाहत्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

कोरोना काळात देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

‘बाप बीप’मधून सुटणार वडील-मुलाच्या नात्यातील गुंता

Patil_p

अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

Rohan_P
error: Content is protected !!