तरुण भारत

भाजपात जाण्याचा अद्याप तरी विचार नाही : गावडे

बार्देशात रवींद्र भवन जागेची 70 टक्के प्रक्रिया पूर्ण

प्रतिनिधी /म्हापसा

Advertisements

विधानसभा निवडणुका जवळ आल्या असल्या तरी भाजपमध्ये जाण्याचा तसा अद्यापतरी विचार केलेला नाही, तसेच आपल्यास ऑफर वा तयारी नाही. आपण मन लावून काम करीत आहे. भाजपमध्ये विचारांची देवाण घेवाण होत आहे. आणि ज्या सरकारात आहे त्यात प्रियोळ मतदारसंघ विकसित करण्यासाठी आहे आणि आपल्यास सरकारने भरपूर मदत केलेली आहे. निवडणुकीत आमदार झालो पूर्व प्लेन होता त्यामुळे आपले कर्तव्य आहे भाजपबरोबर रहावे आणि राहीलेलो आहे. अशी माहिती कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दै. ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. बार्देशात रवींद्र भवनासाठी म्हापशात जागेची 70 टक्के प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

निकाल होण्यापूर्वी मला पत्रकारांनी प्रश्न केला होता की, राज्यात काँग्रेसचे आमदार आघाडीवर आहेत तुम्ही निवडून आला तर तुमची भूमिका काय असेल असा प्रश्न केला असता ज्या पक्षात मला आधार मिळाला त्या पक्षाबरोबर राहणे आपले पहिले कर्तव्य असणार असे उत्तर दिले होते. मी पक्षाकडे प्रामाणिक आहे. मी स्वतंत्र म्हणून भाजप व मगोच्या युतीविरुद्ध गेलो होतो. माझ्यासाठी पक्षश्रेष्ठ नसून आपल्या जवळ कार्यकर्त्यांचे जे बळ आहे ते बळ घेऊन आपण स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आलो आहे असे मंत्री म्हणाले.

युतीबाबत मी बोलणार नाही

मी कुठल्याही पक्षाकडे जुळलेलो नाही त्यामुळे राज्यात युती व्हावी की नाही याबाबत आपण काहीच बोलू शकत नाही. ते ते पक्ष निर्णय घेणार त्या दृष्टीकोनातून त्यांनी घ्यावा. आपले कार्यकर्ते काय विचार करणार त्याद्वारे आपला निर्णय असेल असे आपण आजपर्यंत सांगत आलो आहे असे मंत्री गावडे यांनी सांगितले.

प्रियोळात साधन सुविधा देण्यास आपण यशस्वी झालो

मगोबाबत प्रियोळ मतदारसंघात आपल्यास काहीच बोलायचे नाही. आमदार वा विरोधक या नात्याने या मतदारसंघात त्यांचे काहीच काम नाही असे आपण म्हणणार. आज माझ्या कामातून काय करू शकतो व केलेले आहे ते असंख्य प्रियोळ मतदारसंघातील मतदारांना कार्यकर्त्यांना व त्या मतदारसंघात आलेल्या सगे सोयऱयांना माहीत आहे. हा मतदारसंघ गोव्याच्या विकासात दुर्लक्ष होता. कारण हा मतदारसंघ एक शेतीप्रदान मतदारसंघ येथे डोंगर आहेत, तळी, शेती आहे त्यांना प्राधान्य देणे आपले कर्तव्य असून त्यादृष्टीने गांभीर्याने आपण लक्ष दिलेले आहे. त्यांना ज्या साधन सुविधा द्यायला पाहिजे त्या देण्यास आपण यशस्वी झालो आहे अशी माहिती मंत्री श्री. गावडे यांनी दिली.

अपक्ष उमेदवार म्हणून सर्वाधिक मते घेऊन विजयी झालो

आगामी काळात मगोचा आपल्यास काहीच फरक पडणार नाही. भाजप आणि मगोची जेव्हा युती झाली होती त्यावेळी आपण थोडय़ा मतानी पराभव झालो होतो. गेल्यावेळी भाजप आपल्यास तिकीट देण्यास आले होते मात्र आपण ती नाकारली कारण आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम व प्रेम हा मला फळाच्या रुपाने मिळणार हे मला माहीत होते. त्यावेळी स्व. मनोहर पर्रीकर यांनी मला पाठिंबा देण्याचे ठरविले व राज्यात आपण स्वतंत्र उमेदवार म्हणून सर्वाधिक मते घेऊन विजयी झालो असल्याची माहिती मंत्री गावडे यांनी दिली. आपल्या मतदारसंघात विरोधक असे कुणी नाही. विरोधकांचे अस्तित्व राहिलेले नाही असे आपण ठामपणे सांगतो असे ते म्हणाले.

उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला म्हापशात रवींद्र भवनासाठी जागा

बार्देशे तालुक्यात रवींद्र भवनासाठी म्हापसा उपजिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयाजवळ बाजूला शेत आहे. त्या शेताचे डिमारकेशन केले आहे. तेथे टेनंट आहेत त्यानाही आम्ही विश्वासात घेतले आहे. जवळ जवळ अर्धी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. ती जागा ऍग्रीकल्चरल झोन म्हणून नोंद झालेली आहे. यावर विधानसभेत चर्चा करून बार्देशमध्ये रवींद्र भवन बांधण्याच्या तयारीत आहे. बार्देश कलाकारांची खाण आहे. पूर्वी नार्वेकरांच्या मंडपातही खुली नाटके होत होती हे आम्हाला माहीत आहे.

पेडणेत रवींद्र भवनसाठी 29 हजार चौमीटर जागा

पेडणेच्या रवींद्र भवनासाठीही जागा नोंद केली आहे. रवींद्र भवन पेडणेसाठी 29 हजार चौमीटर जागा क्रीडा व्यवहार खात्याने कला संस्कृती खात्याकडे यापूर्वीच सुपूर्द केलेली आहे. प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोविडमुळे हे राहिले आहे. ते येत्या दिवसात पूर्ण होणार आहे. राजकीय सुडापोटी काहीजण बोलतात त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. काहीजण कला संस्कृती खात्यावर टिका करतात हे मान्य आहे. ज्या लोकांनी या खात्याचा फायदा घेतला अनुदान घेतला त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांनी कुणी या खात्याचे मानधन घेतले नाही कोणताही पुरस्कार वा आधार घेतला नाही त्यांना बोलायचा अधिकार आहे. काहीजणांना नाहक कुणीतरी पेरतात तेच नाहक विरोधक बोलण्यास पुढे येतात असे आपण म्हणतो असे मंत्री गावडे म्हणाले.

Related Stories

गोव्याच्या हिताआड येणाऱया प्रकल्पांना काँग्रेस पक्षाचा विरोध असेल

Patil_p

केपे बाजार प्रकल्पाचे अपुर्णावस्थेतच उद्घाटन

Patil_p

मगो पक्षाच्या ‘बोलबच्चनांनी’ पुराव्यासह आरोप करावे-सुदेश भिंगी यांचे आव्हान

Omkar B

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत राज्यात उत्सुकता शिगेला

Patil_p

‘दी स्कायलाईन’ नियतकालिकेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रकाशन

Amit Kulkarni

‘कारखानीसांची वारी’ मध्यमवर्गीय कुटुंबातील गुंतागुंतीचे आयुष्य आणि नातेसंबंधांवर तिरकस भाष्य करणारा चित्रपट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!