तरुण भारत

येडियुराप्पांच्या राजीनाम्यामुळे शेतकऱयाची आत्महत्या

प्रतिनिधी /बेंगळूर

मुख्यमंत्रीपदाचा येडियुराप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांचा चाहता असलेल्या एका शेतकऱयाने आत्महत्या केली आहे. चामराजनगर जिल्हय़ाच्या गुंडलुपेठ येथे ही घटना घडली आहे. राजप्पा (रवी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. या घटनेबद्दल येडियुराप्पा यांनी शोक व्यक्त केला. तसेच राजकारणात चढ-उतार ही साहजिकच बाब आहे. त्यासाठी प्राणाचा त्याग करण्याच्या घटनांचे समर्थन करणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अभिमानाचा चाहत्यांनी कधीही अतिरेक करू नये. रवी याच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण साहभागी आहे, असेही ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

Abhijeet Shinde

बेंगळूर : मंत्री सुधाकर यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी साधला संवाद

Abhijeet Shinde

कोविड लॅबमधील कंत्राटी कर्मचाऱयांनाही भत्ता

Amit Kulkarni

कर्नाटक: एसएसएलसी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Abhijeet Shinde

मेट्रो रेल्वेच्या दुसऱया टप्प्यातील विस्तारित योजनेचे उद्घाटन

Patil_p

शैक्षणिक शुल्कात 30 टक्के कपात

Patil_p
error: Content is protected !!