तरुण भारत

लोकमान्य मिलिटरी टेनिंग ऍकॅडमी नवी बॅच लवकरच

प्रतिनिधी /बेळगाव

लष्करी प्रशिक्षण देणाऱया ‘लोकमान्य मिलिटरी टेनिंग ऍकॅडमीचे अनेक प्रशिक्षणार्थी भारतीय सेनेसोबत निमलष्करी दलामध्ये दाखल झाले आहेत. उत्तम प्रशिक्षण, लेखी परीक्षेची तयारी, लष्करातील निवृत्त प्रशिक्षक यांच्यामुळे अल्पावधीतच महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथील प्रशिक्षणार्थींनी येथे येवून प्रशिक्षण घेतले आहे. लोकमान्य संस्था केवळ बँकिंग क्षेत्रापुरती मर्यादित न राहता शिक्षण, विमा, हॉटेल्स, रिसॉर्ट अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. लोकमान्य समूहाचे प्रेरणास्त्रोत किरण ठाकुर यांच्या कल्पक दृष्टीकोनातून हजारो युवक युवतींना रोजगार मिळाला आहे.

Advertisements

‘सक्षम एवमं प्रगती’ या ब्रीद वाक्मयानुसार लोकमान्य टेनिंग ऍकॅडमीची घोडदौड सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांना भारतीय सेना, वायु सेना, नौदल, मिलिटरीशी समांतर असणाऱया बीएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, सीआरपीएफ, सीआरएसएफ इत्यादिंमध्ये भरती व्हायचे असेल अशा विद्यार्थ्यांना येथे शारिरिक व लेखी परिक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. याचबरोबर एसएसबी, ओटीए, एडीए यांचेही प्रशिक्षण देण्यात येते. लोकमान्यचे सीएसओ, निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल दीपक गुरूंग यांच्या सोबत इतर लष्करी अधिकाऱयांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात येते.

आवश्यक पात्रता

टेनिंग ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेणारा प्रशिक्षणार्थी हा 10 वी, 12 वी उत्तीर्ण हवा. 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्षे (सैनिकांसाठी), तर 17 वर्षे 6 महिने ते 25 वर्षे (अर्धसैनिकांसाठी) वयोमर्यादा आवश्यक आहे. सोबत दहावी व बारावीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, डोमिसाईल पत्र, शाळा सोडल्याचा दाखला, ग्राम पंचायतीचा दाखला, वर्तणुकीचा दाखला,  कलर फोटो या सर्वांच्या तीन झेरॉक्स प्रति नोटरीसह येवून कार्यालयात भेटावे.

लवकरच नवीन बॅचला सुरूवात

कोरोनामुळे मागील काही महिने मिलिटरी टेनिंग बंद ठेवण्यात आले होते. परंतु आता कोरोना आटोक्मयात येत असल्यामुळे पुन्हा एकदा लष्करी प्रशिक्षण सुरू केले जाणार आहे. लवकरच लोकमान्य मिलिटरी टेनिंग ऍकॅडमीची नवीन बॅच सुरू होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेदमंदिर, राणी चन्नम्मा नगर, बेळगाव येथील टेनिंग ऍकॅडमीमध्ये नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 0831-2420120 किंवा 80732 76856, 70224 69543 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन ऍकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.

ऍकॅडमीची वैशिष्टय़े

  • शारीरिक व वैद्यकीय तपासणी करूनच प्रवेश
  • मिलिटरीच्या धर्तीवर 3 महिने प्रशिक्षण
  • शारीरिक व्यायामासाठी प्रशस्त मैदान व मल्टिजीमची सोय
  • राहण्याची उत्तम सोय
  • कुशल प्रशिक्षक वर्ग
  • प्रत्येक आठवडय़ाला लेखी व शारीरिक परीक्षा

Related Stories

दोन हजारांसाठी गवंडी कामगाराचा खून

Amit Kulkarni

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मनोज देसाईला सुवर्णपदक

Amit Kulkarni

परीक्षेच्या भितीने विद्यार्थिनीची आत्महत्या

Rohan_P

खासबाग येथे कुरियर कंपनीचे कार्यालय फोडले

Amit Kulkarni

संक्रांतीसाठी बाजारपेठ बहरली

Patil_p

तातडीने खटले निकालात काढण्यासाठी 19 डिसेंबरला लोकअदालत

Omkar B
error: Content is protected !!