तरुण भारत

पूर ओसरतोय, पण नागरिकांच्या वेदना कायम

पावसाच्या प्रमाणातही घट : पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू : लोकवस्तीत पाणी शिरल्याने कोटय़वधीचे नुकसान

वार्ताहर /एकसंबा

Advertisements

पावसाबरोबरच धरणातून सोडण्यात येणाऱया पाण्याच्या विसर्गातही घट झाल्याने कृष्णा व दूधगंगेच्या पाणीपातळीत मंगळवारपासून संथ उतार होत असल्याचे पहावयास मिळाले. पूर जरी ओसरत असला तरी पूरग्रस्तांमध्ये वेदना मात्र कायमच्या घर करून राहणार आहेत. लवकरात लवकर पूर्णपणे पाण्याचा विसर्ग होऊन पाणी नदीपात्रामध्ये जावे, अशी प्रार्थना पूरग्रस्त नागरिक करत आहेत. या पुरामुळे हजारो नागरिकांना निवारा केंद्राचा आधार घ्यावा लागला आहे. या पूरग्रस्त नागरिकांसाठी विविध भागातून मदतीचा ओघही सुरूच आहे. यामुळे पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन पहावयास मिळत आहे.

पाऊस पूर्णपणे थांबल्याने पाचव्या दिवसानंतर किंचित कृष्णा व दूधगंगेच्या पाणीपातळीत घट झाली आहे. तसेच महाराष्ट्रातून येणाऱया पाण्याच्या विसर्गातही घट झाली आहे. पण अद्यापही महापुराचा विळखा कायम असल्याचे दिसत आहे. नदीकाठच्या परिसरातील लोकवस्तीत मोठय़ा प्रमाणात पाणी असल्याने कोटय़वधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक वषी पूरस्थितीची समस्या उद्भवत असते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे महत्त्वाचे आहे. 2019 सालच्या महापुराला ऑगस्ट महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षे पूर्ण होण्याअगोदरच 2021 मध्ये महापुराचा विळखा बसल्याने प्रत्येक वषीचा पावसाळा नदीकाठच्या नागरिकांसाठी धोकादायकच ठरत आहे.

महापुरामुळे हजारो नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. नदी काठावरील अनेक गावे पूर्णपणे जलमय झाली आहेत. तर काही गावांच्या जवळपासच महापुराचे पाणी येऊन थडकले आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत नदीकाठ कोरडे पडत होते. तेव्हा ‘नदी उशाला अन् कोरड घशाला’ असे म्हणण्याची वेळ येत होती. पण आता पाणी उशाला असूनही कोरड घशाला पडत असल्याचे दिसत आहे. पाणीपुरवठा करणारी मोटर पंपसेट बाहेर काढल्याने अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहेत. तर काही गावांना कूपनलिकांच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.

2019 सालात आलेल्या जलप्रलयामुळे वेदगंगा, दूधगंगा व कृष्णा नदी काठावरील हजारो हेक्टर परिसरातील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच मोठय़ा प्रमाणात घरांचीही हानी झाली होती. या संकटावर मात करून कसाबसा बळीराजा सावरतो तोवर कोरोनाचा महाभयंकर प्रादुर्भाव आर्थिक संकटात भर टाकतो. दोन वर्षे झाली तरी कोरोनाची स्थिती बिकटच आहे. महिन्याभरापूर्वी सर्व व्यवहार सुरळीत होते. दोन महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आर्थिक व्यवहार गती घेत होते. सर्व काही सुरळीत होणार असे वाटत असतानाच नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसल्याने मोठी आर्थिक हानी सहन करावी लागत आहे. पूरग्रस्तांच्या वेदनांना लवकरच पूर्णविराम मिळो हिच अपेक्षा सर्व स्तरातून होत आहे.

 सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दूधगंगा नदीत 880 क्मयुसेकने विसर्ग कमी झाला असून तो 51 हजार 920 इतका झाला आहे. तर राजापूर बंधाऱयातून 3 लाख 40 हजार क्मयुसेक इतका विसर्ग कायम आहे. कल्लोळ कृष्णा नदीपात्रात 880 क्मयुसेकने पाण्याच्या प्रवाहात घट झाली असून 3 लाख 91 हजार 920 क्मयुसेक इतके मंगळवारी पाणी येत होते. कृष्णा नदीची धोका पातळी 537 मीटर असून मंगळवारची पाणीपातळी 538.83 मीटर इतकी होती. 0.27 मीटर इतकी पाणीपातळीत घट झाली आहे. तर दूधगंगेची धोका पातळी 538 मीटर असून सोमवारची पाणीपातळी 539.3240 मीटर इतकी होती. 0.8 मीटर इतकी पाणीपातळीत घट झाली आहे. चिकोडी-मिरज या आंतरराज्य मार्गावर अंकलीनजीक अद्यापही खूप पाणी असल्याने हा मार्ग अद्यापही बंदच आहे.

पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहता कोयना 46 मि. मी., नवजा 45 मि. मी., वारणा 27 मि. मी., राधानगरी 84 मि. मी., महाबळेश्वर 54 मि. मी., पाटगाव 37 मि. मी., काळम्मावाडीत 24 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर चिकोडी तालुक्मयातील पर्जन्यमापन केंद्रावरही पाऊस कमी झाला आहे. चिकोडी येथे 0.4 मि. मी. पाऊस झाला आहे. आलमट्टी धरणात 75.58 टीएमसी पाणीसाठा असून 3 लाख 55 हजार 396 क्मयुसेक आवक होत असून 3 लाख 10 हजार 10 क्मयुसेक विसर्ग होत आहे. मंगळवारपर्यंत धरणातील असणारा पाणीसाठा व विसर्ग पाहता कोयना 86.45 टक्के, वारणा 91.8 टक्के, राधानगरी 99.4 टक्के, कण्हेर 78.42 टक्के, धोम 79.11 टक्के, काळम्मावाडीत 83.9 टक्के पाणीसाठा झाला आहे.

Related Stories

समिती उमेदवारांच्या प्रचार फेरीवेळी विद्युतपुरवठा खंडित

Amit Kulkarni

वाल्मिकी नायक समाजाचे धरणे आंदोलन

Patil_p

न्यायालयाच्या आवारासमोर भर उन्हात पक्षकार ताटकळतच

Omkar B

निपाणीत आज नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवड

Patil_p

बिम्सचे वैद्यकीय संचालक प्रदीर्घ मुदतीच्या रजेवर

Amit Kulkarni

दुचाकी अपघातात दोघे ठार

Patil_p
error: Content is protected !!