तरुण भारत

सांगलीवाडीत नागरी वस्तीत शिरलेली अजस्त्र मगर पकडली


सांगली / प्रतिनिधी

आयर्विन पुलाच्या दुसऱ्या बाजूला महापुरात सांगलीवाडीच्या नागरी वस्तीत पोहोचलेली 12 फुटी अजस्त्र मगर वन विभागाने युवकांच्या मदतीने बुधवारी दुपारी पकडली आहे.

सुमारे १२ फूट लांबीची मगर कृष्णा नदीला आलेल्या महापुरात सांगलीवाडी गावातील नागरी वस्तीत आली होती. गावाचा बराच भाग पाण्याखाली होता. गेल्या दोन दिवसांपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली असताना बुधवारी सांगलीवाडीत सकाळी ११ च्या सुमारास धरण रोडवरील वीर मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही मगर दिसली. त्यांनी नागरीवस्तीत जात असलेल्या या मगरीला लिंगायत स्मशानभूमीकडे हुसकावून लावले व तात्काळ ही माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाचे अधिकारी आणि सांगलीवाडी येथील नागरिकांच्या मदतीने ही मगर पकडण्यात अखेर यश आले. मगर पाहण्यासाठी सांगलीवाडी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

जूनमध्ये आयर्विन पुलाच्या दुसऱ्या बाजूला सखल भागात अजस्त्र मगरीचा वावर असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यावेळी शोध घेऊनही मगर सापडली नव्हती. आता लिंगायत स्मशानभूमी परिसरात हे मगर आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीत मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असून महापुरामुळे कोणकोणत्या नागरी वस्तीत आल्या आहेत यावर चर्चा सुरू झाली आहे. डिग्रज येथे छतावर अडकून पडलेली मगर आजूबाजूच्या गावात मगरीच्या जाणवू लागल्याने जनतेत भीतीचे वातावरण असून वन विभागाने काही काळ सर्व गावात पथके तैनात करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

“…तुम्हाला त्या प्रत्येक सेकंदाची किंमत चुकवावी लागेल”; संजय राऊत यांचा भाजपाला इशारा

Abhijeet Shinde

दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकरी ऑक्सिजनवर

Abhijeet Shinde

कनाननगरातील कुटुंबांना भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगेंकडून मदत

Abhijeet Shinde

मलिकांकडून इंटरव्हलपर्यंतची कथा; त्यापुढील मी सांगणार

datta jadhav

महापालिका त्रिसदस्यीय प्रभाग रचना; प्रस्थापितांच सोपं, नवख्यांच अवघड

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्याची चिंता वाढली; १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!