तरुण भारत

श्वानाच्या शोधासाठी यंत्रणाच जुंपली

पाकिस्तानातील अजब प्रकार – गुजरांवाला आयुक्तांचा श्वान पसार

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisements

उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री राहिलेले आझम खान यांची म्हैस चोरीला गेल्यावर पोलीस आणि प्रशासनाने घरोघरी जात झडती घेतली होती. काहीसा असाच प्रकार पाकिस्तानात घडला आहे. तेथील गुजरांवाला शहराचे आयुक्त जुल्फिकार घुमन यांचा पाळीव श्वान बेपत्ता झाला, आयुक्तांच्या अधिकृत निवासस्थानाचे प्रवेशद्वार काही काळासाठी खुले राहिले असताना श्वान पसार झाल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी पूर्ण प्रशासनच जुंपण्यात आले आहे.

पोलीस आणि नगरपालिकेचे अधिकारी रिक्षावर ध्वनिक्षेपक (लाउडस्पीकर) बसवून श्वान बेपत्ता झाल्याची माहिती देत होते. तसेच कुणाच्या घरानजीक हा श्वान आढळल्यास संबंधिताच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही स्थानिक लोकांना देण्यात आला आहे.

घरोघरी झडतीची मागणी

आयुक्ताने श्वान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घरोघरी झडती घेण्याची मागणी केली आहे. याचमुळे गुजरांवाला नगरपालिका आणि पोलीस विभागाला श्वानाच्या शोधासाठी तैनात करण्यात आले आहे. अधिकारी शहराच्या गल्ल्यांमध्ये घरोघरी जात श्वानाचा शोध घेत आहेत. लोकांकडे त्याच्याबद्दल विचारणा देखील करत आहेत.

सोशल मीडियावर टीकेची झोड

पाकिस्तानात सोशल मीडिया युजर्स या प्रकरणावरून आयुक्तांवर टीका करत आहेत. प्रशासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर होत असल्याचा आरोप लोकांकडून केला जात आहे. चोर आणि दरोडेखोरांना पकडण्याऐवजी पोलीस श्वानाला शोधत आहेत असेही म्हटले जात आहे.

Related Stories

तैवानला हवी अनुमती

Patil_p

कोरोना : चीनमध्ये मृतांचा आकडा 425 वर

prashant_c

राजपुत्र विलियम यांनाही लागण

Patil_p

सरकार स्थापनेपूर्वीच तालिबानमध्ये संघर्ष

Patil_p

भ्रष्टांच्या यादीत बेलारुसचे अध्यक्ष अग्रस्थानी

Patil_p

कंबोडियाने केली भारताकडे लसीची मागणी

datta jadhav
error: Content is protected !!