तरुण भारत

एका रात्रीत पडला 20 वर्षांचा विसर

सकाळी उठला अन् शाळेत जाऊ लागला

विस्मृतीचा आजार झाल्यावर माणूस घाबरून जातो, अत्यंत आवश्य असलेली बाब न आठवल्यास काय होईल याची भिती संबंधिताला वाटू लागते. अमेरिकेच्या टेक्सासमधील एक व्यक्ती एका रात्रीत 20 वर्षांमधील स्मृती विसरून बसला. म्हणजेच मागील 20 वर्षांमध्ये घडलेल्या सर्व घडामोडींबद्दल तो पूर्णपणे अनभिज्ञ झाला आहे.

Advertisements

37 वर्षीय डेनियल पोर्टर पेशाने हियरिंग स्पेशलिस्ट आहेत. एका रात्री ते निवांत झोपी गेले होते. सकाळी उठल्यावर मात्र त्यांना सर्वकाही ओळखण्यास अडचण होऊ लागली. ते स्वतःच्या पत्नीलाही ओळखू शकत नव्हते. ऑफिसऐवजी डेनियल शाळेत जाण्याची तयारी करू लागले होते.

स्वतःला विद्यार्थीच समजले

त्यांची स्मृती 20 वर्षे मागे गेली होती. ज्यामुळे ते स्वतःला माध्यमिक विद्यार्थी समजत होते. एखाद्या महिलेने स्वतःचे अपहरण केल्याचे त्यांना स्वतःच्या पत्नीला पाहून वाटू लागले होते. पण आरशात पाहिल्यावर 17 वर्षांच्या वयात आपण एवढे स्थुल आणि वृद्ध कसे असू शकतो हा प्रश्न त्यांना पडला.

काही आठवेचना

त्यांची पत्नी रुथ आणि 10 वर्षीय मुलीने त्यांच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला,  पण त्यांना काहीच आठवत नव्हते. त्यानंतर रुथ डेनियल यांना घेऊन त्यांच्या पालकांकडे पोहोचली. तेथे पोहोचल्यावर डेनियल यांना स्वतःचे घर आठवले. तरीही ते मागील 20 वर्षांच्या आयुष्याबद्दल काहीच आठवू शकले नाहीत. आता तर डेनियल स्वतःच्या पाळीव प्राण्यांना पाहून मुलांप्रमाणे घाबरत आहेत. स्वतःचा पेशाही त्यांनी सोडून दिला आहे.

परतली नाही स्मृती

हा शॉर्ट टर्म मेमरी लॉस असून 24 तासांमध्ये सर्व काही आठवेल असे डॉक्टरांनी प्रारंभी सांगितले होते. पण या घटनेला वर्ष उलटूनही डेनियल यांना मागील 20 वर्षांमधील कुठलीच घटना आठवत नाही. डेनियल यांची स्मृती भावनिक ताणामुळे गेली असावी असे डॉक्टरांचे मानणे आहे.

Related Stories

अर्जुना धरण ओव्हर फ्लो

Patil_p

कोरोनासंबंधी नवी मार्गदर्शक तत्त्वे घोषित

Omkar B

केजरीवाल सरकारने लपविला कोरोनाबळींचा आकडा

Amit Kulkarni

दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या प्रारंभी

Patil_p

कोरोनाचा कहर! उत्तराखंडात उच्चांकी रुग्ण संख्या

Rohan_P

अरविंद केजरीवाल यांची जयपूरमध्ये ध्यानसाधना

Patil_p
error: Content is protected !!