तरुण भारत

कोरोना-वाढत्या किमतीमुळे स्टील व्यवसायावर परिणाम

नवी दिल्ली

 मागील दीड वर्षांच्या कालावधीपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विविध व्यवसाय प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यातीलच एक म्हणजे स्टील उद्योगाला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे.

Advertisements

सध्या देशभरात किमती वाढल्याने स्टील क्षेत्र प्रभावीत होत गेले आहे. यामध्ये विविध लहान मोठे व्यावसायिकही भितीच्या छायेखाली वावरत आहेत. आगामी काळात देशात सणासुदीचे दिवस येणार आहेत. यामध्ये जर कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली तर काही प्रमाणात शिल्लक राहिलेली सकारात्मक स्थिती धुळीस मिळण्याचे संकेत अभ्यासकांनी दिले आहेत.

सध्या स्टीलच्या किमती वेगाने वाढत आहेत. याचे कारण म्हणजे किमती वधारत असल्याने जो काही नफा मिळत होता तोही मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाला. व्यापारी माल मिळत नसल्याने अडचणींचा सामना करत आहेत.

स्टीलचा अधिक वापर

स्टेनलेस स्टील उत्पादनांची अधिक आवश्यकता भासतेच. यामध्ये स्टेनलेस स्टीलचे गेट, रेलिंग, खिडकी आदीमध्ये स्टीलचा वापर केला जातो. यात किमती वाढल्याने स्टील उत्पादन अधिक प्रमाणात नुकसानीत आहे.

Related Stories

चिप तुटवडय़ामुळे कार उत्पादनावर होणार परिणाम

Patil_p

मारूतीची नवी कार घ्या आता हप्त्यावर

Omkar B

सप्ताहाच्या अंतिम दिवशी तेजीची उसळी

Patil_p

भारतीयांना यंदा रिलायन्स जिओची 5 जी भेट

Patil_p

कोरोना प्रभावामुळे एप्रिलमध्ये वाहन कंपन्यांच्या विक्रीत घसरण

Patil_p

आयपीओंमधून 2 लाख कोटी उभारणार ?

Patil_p
error: Content is protected !!