तरुण भारत

कोडली येथील इसमाचा मृतदेह सापडला

पुरात बुडून मृत्यू आल्याचा अंदाज

प्रतिनिधी/ कुडचडे

Advertisements

मल्लारीमळ, कोडली, किर्लपाल-दाभाळ येथील महादेव मोमू गावकर (वय 46) याचा 23 रोजी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात बुडून मृत्यू झाल्याची माहिती कुडचडे पोलीस स्थानकातून प्राप्त झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सदर व्यक्ती 23 रोजी घरातून बाहेर निघाली होती. ती परत न आल्यामुळे शोध सुरू होता.

पावसाचा जोर कमी होऊन पुराचे पाणी उतरले असता मंगळवार 27 रोजी सकाळी सुमारे 6.30 वा. सदर व्यक्तीचा मृतदेह झाडात अडकून पडलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यामुळे सदर इसमाचा मृत्यू बुडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या घटनेचा पंचनामा निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश नाईक यांनी केला. शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबियांकडे देण्यात आल्याची माहिती कुडचडे पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

Related Stories

म्हापशाहून 63 विदेशी नागरिकांना परत अमेरीकेला पाठविले

Patil_p

नेत्रावळी अभयारण्यात दुर्मिळ ‘ब्लॅक पँथर’चा वावर

Patil_p

मोफत विजेचे आश्वासन म्हणजे ऋण काढून सण आमदार नीळकंठ हळर्णकर यांची टीका

Amit Kulkarni

पाण्याच्या दरांत केलेली वाढ त्वरित मागे घ्यावी : कुतिन्हो

Amit Kulkarni

कुप्रसिद्ध गुंड अन्वर शेख याला खांडोळा येथून अटक

Patil_p

वास्को-पाटणा रेल्वे मार्गावर उद्यापासून ‘हमसफर एक्स्प्रेस’

Omkar B
error: Content is protected !!