तरुण भारत

स्वामीनगर, मच्छे येथे गुरुपौर्णिमा साजरी

वार्ताहर/ किणये

स्वामीनगर, मच्छे येथील हरिओम महिला भजनी मंडळातर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त किणये येथील संगीत शिक्षक शंकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान मोठे आहे. गुरुंचा आशीर्वाद नेहमीच प्रेरणा देणारा असतो. म्हणून साऱयांनी आपल्या गुरुजनांचा आदर केलाच पाहिजे, असे मनोगत हेमलता देसाई यांनी व्यक्त केले.

शंकर पाटील हे बेळगाव परिसरातील अनेक महिला मंडळांना भजन शिकवितात. त्यांचे हे कार्य समाजहिताचे आहे, असे विचार भरमाण्णा बेळगावकर यांनी व्यक्त केले. शंकर पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला महिला भजनी मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.

Related Stories

कोरोनावरील लस आज बेळगावला येणार

Patil_p

स्वच्छतागृह बांधण्यास तीव्र विरोध

Amit Kulkarni

दुभाजकांवरील अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई

Patil_p

कर्नाटक कायदा सेवा प्राधिकार सदस्यपदी डॉ. विनोद गायकवाड

Amit Kulkarni

पेट्रोलचा दर 81 पार; डिझेल 74 वर

Patil_p

निवडणूक चिन्ह वाटपानंतर फुटला प्रचाराचा नारळ

Omkar B
error: Content is protected !!