तरुण भारत

चिंताजनक : महाराष्ट्रातील सक्रिय रुग्ण संख्या 82,545 वर

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. यासोबतच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील वाढली आहे. मागील 24 तासात राज्यात 6 हजार 857 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 6 हजार 105 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 286 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisements


राज्यात आजपर्यंत एकूण 60 लाख 64 हजार 856 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 1,32,145 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.


दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,73,69,757 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,82,914 (13.26 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,88,537 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,364 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 82 हजार 545 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • मुंबई : रुग्ण दुप्पतीचा काळ 1383 दिवस


मुंबईत मागील 24 तासात 404 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 382 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 06 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,35,165 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 15,795 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 5,280 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Related Stories

करवीर पश्चिम भागातील ‘त्या ‘ चौघांचा अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

विजापूर जिल्ह्यात प्रवेशासाठी कर्नाटकची नाकाबंदी

Abhijeet Shinde

सागरेश्वर अभयारण्याची ऊच्चस्तरीय समितीकडुन चौकशी – आ.अरुण लाड

Sumit Tambekar

“फडणवीस वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नव्हते, त्याचं काय झालं ?”

Abhijeet Shinde

सातारा : मरडवाक येथील त्या वस्तीवरील बेशिस्त वर्तनाची चौकशी करा : भास्करशेठ चव्हाण

Abhijeet Shinde

मध्यप्रदेशातील ‘या’ दोन जिल्ह्यात नाईट कर्फ्यू

Rohan_P
error: Content is protected !!