तरुण भारत

पालकांना दिलासा! खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्क्यांची कपात

ऑनलाईन टीम / मुंबई : 


शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 15 टक्के फी कपातीचा राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Advertisements


राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा 85 टक्के फी भरावी लागणार आहे.


सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीत पालकांकडे फीसाठी तगादा लावण्यापेक्षा शाळेनी फी भरण्याचे स्ट्रक्चरच असे केले पाहिजे, जेणेकरुन एकही विद्यार्थी शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. शाळा ऑनलाईन असल्याने किमान 15 टक्क्याने फीमध्ये कपात केली गेली पाहिजे, असे सुप्रिम कोर्टाने सुचवले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, मागील वर्षभरापासून कोरोना महामारीत शाळा बंद असताना सुद्धा शाळांनी फी वाढवल्याचा तर काही शाळांनी फी वसुली करण्याबाबतच्या तक्रारी पालकांकडून सातत्याने पुढे येत होत्या या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Stories

किश्तवाडमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार

Patil_p

दुर्ग नादच्या ग्रुपने केला लिंगाणा सर

Patil_p

प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

Rohan_P

मिरजेच्या एसटीवर कोल्हापुरात दगडफेक, पंढरपूरात मारहाण

Sumit Tambekar

सातारा हिल मॅरेथॉनचा उद्या होणार थरार!

Patil_p

एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका; कर्मचाऱी संघटनांना उच्च न्यायालयाचे निर्देश

Abhijeet Shinde
error: Content is protected !!