तरुण भारत

8 राज्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये अँटीबॉडी

आयसीएमआरचे सीरो सर्वेक्षण : देशाच्या सरासरीपेक्षा अधिक

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

देशातील दोन-तृतीयांश लोकसंख्येत कोरोना विषाणू अँटीबॉडी विकसित झाल्याचे 21 राज्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. 79 टक्के अँटीबॉडीसोबत मध्यप्रदेश यात आघाडीवर आहे. तर केवळ 44.4 टक्के अँटीबॉडीसह केरळ सर्वात मागे आहे. देशात सध्या सर्वाधिक संक्रमण केरळमध्येच दिसून येत आहे.

राजस्थान 76.2 टक्क्यांसह यादीत दुसऱया स्थानावर आहे. बिहारच्या लोकांमध्ये 75.9, गुजरातमध्ये 75.3, छत्तीसगडमध्ये 74.6, उत्तराखंडमध्ये 73.1 टक्के, उत्तरप्रदेशात 71 टक्के आणि आंध्रप्रदेशात 70.2 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या आहेत.

कर्नाटकातील 69.8 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीचे अस्तित्व दिसून आले आहे. तामिळनाडूत 69.2, ओडिशात 68.1, पंजाबमध्ये 66.5 टक्के, तेलंगणात 63.1, जम्मू-काश्मीरमध्ये 63 हिमाचल प्रदेशात 62, झारखंडमध्ये 61.2, पश्चिम बंगालमध्ये 60.9, हरियाणामध्ये 60.1 टक्के, महाराष्ट्रात 58 टक्के, आसाममध्ये 50.3 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या आहेत.

इंडियन मेडिकल रिसर्च कौन्सिलकडून 14 जून ते 16 जुलैदरम्यान करविण्यात आलेल्या सीरो सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे. कुठल्याही लोकसंख्येच्या ब्लड सीरममध्ये अँटीबॉडीच्या पातळीला सीरोप्रिवलेन्स किंवा सीरोपॉझिटिव्हिटी म्हटले जाते. 

राज्यांनी करावे सीरो सर्वेक्षण

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना आयसीएमआरच्या दिशानिर्देशानुसार स्वतःचे सीरोप्रिवलेन्स अध्ययन करविण्याची सूचना केली आहे. या सीरो सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा कोरोना संक्रमणाच्या नियंत्रणासाठी वापर करता येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Related Stories

Mann Ki Baat : पीएम मोदींकडून साताऱ्याच्या प्रवीण जाधव यांचं ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक

Abhijeet Shinde

बिहारमध्ये आज मतमोजणी

Patil_p

अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये 24 मे पर्यंत मुदतवाढ

datta jadhav

ईएमआय-व्याजदरप्रश्नीकेंद्राने हात झटकू नयेत!

Patil_p

पैशांची पाठशाळा

Patil_p

LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात

datta jadhav
error: Content is protected !!