तरुण भारत

दरवर्षी 65 कोटींचे उत्पन्न मिळवून देणारी ‘मछली’

रणथंबोर नॅशनल पार्कमधील प्रसिद्ध वाघिण

रणथंबोर नॅशनल पार्कमधील एक वाघिण पूर्ण जगात प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. या वाघिणीचे नाव मछली होते. ती बंगाल टायगर होती, 2000 साली वाघांची राणी, लेडी ऑफ लेक, मगर मारणारी वाघीण आणि रणथंबोरची राणी अशा उपमा देखील तिला मिळाल्या होत्या. आजदेखील ती जगातील सर्वात प्रसिद्ध वाघीण आहे.

Advertisements

या वाघिणीच्या चेहऱयावर माशासारखी एक खूण होती, म्हणून तिला मछली हे नाव पडले. ही खूण तिच्या सुंदरतेत भर घालणारी होती. विकिपीडियानुसार तिचा जन्म 1996 किंवा 1997 मध्ये झाला होता. दोन वर्षांतच तिने स्वतःच्या मातेचा भाग सोडून देत स्वतः शिकार करण्यास सुरुवात केली होती.

मछलीने एकूण 11 बछडय़ांना जन्म दिला, यातील 7 मादी तर 4 नर वाघ होते. पार्कमध्ये वाघांची संख्या वाढविण्यात तिचे मोठे योगदान आहे. 60 टक्के हिस्स्याचा संबंध तिच्याच वंशाशी आहे. तिच्या दोन मादी बछडय़ांना सरिस्का राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले होते.

मगरीचीच शिकार

मछली स्वतःच्या शिकार करण्याच्या पद्धतीसाठी ओळखली जायची. 2003 साली तिने 14 फूट लांबीच्या मगरीसोबत झुंज दिली होती. या झुंजीदरम्यान तिचे काही दात तुटले, पण मगर लढेपर्यंत तिने तिला मारले नव्हते. रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये ती आकर्षणाचे केंद्र होती. स्वतःच्या बछडय़ांना वाचविण्यासाठी ती धोकादायक वाघांना भिडायची.

जीवन गौरव पुरस्कार

सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे मछलीला जीवन गौरव (लाइफ टाइम अचिव्हमेंट) पुरस्कारही मिळाला आहे. टॅव्हल टूर ऑपरेटर्सनुसार मछली वाघिणीमुळे दरवर्षी सुमारे 65 कोटी रुपयांचा व्यवसाय मिळत होता. जगात सर्वाधिक छायाचित्रे मछली या वाघिणीचीच काढण्यात आली आहेत.

सरासरीपेक्षा अधिक आयुष्य

बंगाल टायगरचे सरासरी आयुष्य 10 ते 15 वर्षे असते, पण मछली 20 वर्षांची होती. वृद्धम्वात तिने स्वतःचे सर्व दात गमाविले होते. तिचीच मुलगी सुंदरी  या वाघिणीसोबत तिची स्पर्धा चालली होती. वन विभाग मछलीला शिकारीच्या स्वरुपात बांधलेले प्राणी देत होता. 18 ऑगस्ट 2016 रोजी जंगलाच्या या राणीने जगाचा निरोप घेतला होता. हिंदू रितिरिवाजांनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

Related Stories

रिक्षात मिळते पार्कची अनुभुती

Amit Kulkarni

बेघराने मुक्या प्राण्याला दिला निवारा

Patil_p

मुसळधार पावसात मुक्या प्राण्यांचे ‘छत’

Amit Kulkarni

सिनेसम्राट दिलीपकुमार यांनी कोल्हापूरवासीयांबद्दल काढले होते ”हे” गौरवोद्गार

Abhijeet Shinde

वर्षातील 300 दिवस झोपणारा नवा ‘कुंभकर्ण’

Patil_p

या छायाचित्राने मनचं जिंकलं

Rohan_P
error: Content is protected !!