तरुण भारत

किशोरवयीनांना संस्कृतीशी जोडण्याचा पुढाकार

फ्रान्स देतोय 26 हजार रुपयांची रक्कम :  स्थानिक सामग्री खरेदी करण्याची अट

फ्रान्समध्ये किशोरवयीन मुलामुलींना संस्कृतीशी जोडण्यासाठी एक अनोखी मोहीम सुरू झाली आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या या महत्त्वाकांत्री योजनेच्या अंतर्गत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना 26 हजार रुपये खर्च करण्यासाठी मिळतील. ही रक्कम दोन वर्षांमध्ये खर्च करता येणार आहे. पण याकरता पुस्तकांपासून व्हिडिओ गेमपर्यंत स्थानिक स्तरावरच खरेदी करण्याची अट आहे.

Advertisements

व्हिडिओ गेमची निर्माता कंपनी प्रेंच असणे आवश्यक आहे. तसेच हे गेम हिंसक प्रवृत्ती दर्शविणारे नसावेत. या योजनेसाठी स्मार्टफोन ऍप ‘कल्चरल पास’ सादर करण्यात आला आहे. महामारीनंतर किशोरवयीनांमध्ये संस्कृतीबद्दल आत्मियता निर्माण व्हावी अशी मॅक्रॉन यांची इच्छा आहे. कल्चरल पासद्वारे किशोरवयीन फ्रान्समध्ये होणाऱया व्हीआयपी इव्हेंट्स म्हणजेच सॉलेज म्युझियममध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग आणि एविग्नन थिएटर फेस्टिव्हमध्ये सामील होऊ शकतील.

मनाजोगी गोष्ट घेता येणार

याचबरोबर प्रकल्पाशी संलग्न 8 हजार स्थानिक संस्थांमधून मनाजोगी सेवा-गोष्टी घेता येणार आहेत. याचबरोबर चित्रपट, म्युझिक कॉन्सर्ट, नाटक आणि सांस्कृतिक आयोजनांसाठी तिकीट खरेदी करता येईल. प्रौढ होत चालेल्या किशोरवयीनांना सांस्कृतिक गोष्टींशी जोडून घेण्याची संधी दिल्याचे उद्गार एका अधिकाऱयाने काढले आहेत. ऍप सादर झालयावर 73 टक्के किशोरवयीन मुलामुलींनी सांस्कृतिक घडामोडींमध्ये स्वारस्य दाखविले आहे. तर 32 टक्के किशोरवयीन पहिल्यांदाच म्युझियममध्ये पोहोचले. सर्वात मोठी बाब म्हणजे व्हिडिओ गेमपेक्षा पुस्तकांची अधिक खरेदी झाली आहे.

ऍपचा मोठय़ा प्रमाणात वापर पहिल्या दोन महिन्यांमध्येच 6.3 लाख मुलामुलींनी हा ऍप डाउनलोड केला आहे. कल्चरल पासमुळे अनेक पुस्तक दुकानांना लाभ झाला आहे. किशोरवयीन मुलामुलींनी ऍपवर सर्वाधिक खर्च जपानी मंगा कॉमिक्सवर केल्याचे समजते.

Related Stories

कोरोना : इम्यून सिस्टीम पॅटर्नचा शोध

datta jadhav

रियल इस्टेट स्टार्टअपची कमालीची आयडिया

Patil_p

अमेरिकेत वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; 9 मुले जखमी

datta jadhav

म्यानमारच्या सैन्यावर गंभीर आरोप

Patil_p

काबूलमध्ये पुन्हा स्फोट

Abhijeet Shinde

घरातही मुलांना घातलं जातेय हेल्मेट

Patil_p
error: Content is protected !!