तरुण भारत

येणार दमदार बॅटरी असणारे स्मार्टफोन्स

दिग्गज कंपन्यांच्या स्मार्टफोन्सचा समावेश – विविध फिचर्सची सुविधा होणार उपलब्ध

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

गेल्या काही दिवसांपासून स्वस्त व अधिकची फिचर्स असणाऱया स्मार्टफोन्सला मागणी वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून चीनी स्मार्टफोन कंपनी यूलेफोनने आपला नवीन रग्ड स्मार्टफोन पॉवर आर्मर 13 सादर केला आहे.

 या फोनमध्ये 13,200 एमएएच क्षमता असणारी बॅटरी मिळणार आहे. या बॅटरीला एकदा चार्ज केल्यानंतर ती जवळपास 5 दिवस वापरता येईल इतकी चांगली क्षमता आहे. अशाच काही अन्य कंपन्यांचे स्मार्टफोन्सचे वेगळेपण आपण पाहणार आहोत.

1.यूलेफोन पॉवर आर्मर 13 ः

सदरच्या या स्मार्टफोनमध्ये 13200 एमएएचची दमदार क्षमता असणारी जबरदस्त बॅटरी मिळणार आहे. जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी असून फोनमध्ये 48 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस अशा सुविधा मिळणार आहेत.

2. सॅमसंग गॅलेक्सी एफ62 ः

यामध्ये 7000एमएएच क्षमता असणारी बॅटरी मिळणार असून रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट करणारी सुविधा यात मिळणार आहे. फोनमध्ये 6.7इंच एचडी डिस्प्ले असून ज्याचे रिझोल्यूशन 1280 ते 720 पिक्सल राहणार आहे. विविध कॅमेऱयांच्या सुविधेसोबत 6जीबी ते 8 जीबी स्टोरेज रॅम मिळणार असल्याची माहिती आहे.

3.डूजी बीएल 1200 प्रो ः

सदरच्या स्मार्टफोनमध्ये 12000 एमएएच बॅटरीची क्षमता आहे. फास्ट चार्जिंगची सुविधा यात आहे. फोनमध्ये 6 इंच पूर्ण एचडी डिस्प्लेही मिळणार आहे. रिझोल्यूशन 1080 ते 2340 पिक्सल आहे. यामध्ये 16 +13 मेगापिक्सलचा रियर आणि 16 एमपी फ्रन्ट कॅमेरा मिळणार आहे.

4.ब्लॅकव्यू बीव्ही9500 प्रो ः

या स्मार्टफोनमध्ये 10000 एमएएच शक्ती असणाऱया बॅटरीची सुविधा मिळणार आहे. फोनमध्ये 5.7 इंच पूर्ण एचडी डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये 2.5 जीएचझेड होलियो पी70 ऑक्टाकोर 64 बिट प्रोसेसरसोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबीची सुविधा आहे.

5.टेक्नो पोवा2 ः

या स्मार्टफोनमध्ये 7000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळण्यासोबत फोनमध्ये 6.9 इंच पूर्ण एचडी डिस्प्ले मिळणार आहे. 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी लेंससोबत हा फोन येतो.

Related Stories

शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन बाजारात

Patil_p

असूस आरओजी फोन 5 लाँच

Patil_p

वनप्लस नॉर्ड2ची पॅकमॅन आवृत्ती

Patil_p

देशात एप्रिलमध्ये स्मार्टफोन विक्री शुन्यावर

Patil_p

एलजीचा फिरत्या स्क्रीनचा फोन 14 सप्टेंबरला येणार

Patil_p

मोटो जी 51- 5 जी 10 डिसेंबरला

Patil_p
error: Content is protected !!