तरुण भारत

कर्नाटकात शुक्रवारी १ हजार ६३१ रुग्ण कोरोनामुक्त, तर ३४ मृत्यू

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. पूर्ण लॉकडाऊननंतर राज्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. परंतु दररोजच्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमी जास्त होत आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,८९० नवीन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. तर १,६३१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात शुक्रवारी ३४ रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.३० टक्के होते. तर मृत्यू दर १.७९ टक्के होता.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९,०३,१३७ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,४३,११० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,५२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २३,४७८ इतकी आहे.

राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ४२६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ३६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्यात ९ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.

Advertisements

Related Stories

कर्नाटक: दिल्लीत प्रथम यात्री निवास बांधा : मुख्यमंत्री येडियुरप्पा

Abhijeet Shinde

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांना फक्त खुर्चीची चिंता : शिवकुमार

Abhijeet Shinde

मागण्यांच्या पूर्ततेसाठी आशा कार्यकर्त्यांचे ऑनलाईन आंदोलन

Amit Kulkarni

उच्च शिक्षणमंत्र्यांनी विद्यापीठांना परीक्षा घेण्याचे दिले निर्देश

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये भाजप आमदाराची सरकारविरोधात निदर्शने

Abhijeet Shinde

भाजप मंत्री पोहोचले चक्क जीवंत जवानाच्या घरी श्रद्धांजली वाहण्यासाठी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!