तरुण भारत

शुक्रवारी 103 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

59 जणांनी केली कोरोनावर मात

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शुक्रवारी जिल्हय़ातील आणखी 103 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 59 जणांनी कोरोनावर मात केली असून रायबाग तालुक्मयातील एका 70 वषीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे.

सदाशिवनगर, विजयनगर-हिंडलगा, बसवनगर, बसवणकुडची, काळीआमराई, कलमठ रोड, कणबर्गी, नेहरुनगर, वीरभद्रनगर, शास्त्राrनगर, शाहूनगर, श्रीनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव शहर व उपनगरांतील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 78 हजार 201 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 76 हजार 726 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 610 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 865 इतका आहे. गेल्या 24 तासात जिल्हय़ातील 968 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 3 हजार 507 हून अधिक जणांचे अहवाल यायचे आहेत. 57 हजार 874 रुग्ण अद्याप 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. दोन दिवसांत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडय़ाने 2 हजारांचा टप्पा पार केला होता. अलिकडे केवळ 1000 ते 1200 नवे रुग्ण आढळून येत होते. शुक्रवारीही संपूर्ण राज्यात 1 हजार 890 रुग्ण आढळून आले आहेत. तर 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

हलगा लक्ष्मी मंदिरात सव्वा लाखाची चोरी

Omkar B

युवा समितीचे खासदार संभाजीराजेंना निवेदन

Amit Kulkarni

युवासेनेच्या कार्याची प्रशंसा

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 32 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Rohan_P

नियोजनाला कष्टाची जोड, दर्जेदार पिकांची लाभली साथ

Omkar B

‘किंगपिन’ किरण विरनगौडरला अखेर अटक

Rohan_P
error: Content is protected !!