तरुण भारत

सांगली : आमणापूर पुलावरील पाणी ओसरले

महापूराने पुलांच्या संरक्षक पाईपचे नुकसान

प्रतिनिधी / पलुस

Advertisements

कोयना धरणाचा विसर्ग वाढवल्याने पलुस तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये शुक्रवारपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे आज शनिवारी सकाळी आमणापूर पुलावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तर दुपारपासून पाणीपातळी घटू लागल्याने पुलावरील पाणी ओसरु लागल्याने आहे. यामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. भिलवडीतील पाणी पातळीत दिवसभरात एका फुटांने वाढ होऊन दुपारी २ वाजता ३८.७ इंचावर पोहचली होती. ती ओसरून ३८ फुटावर आली आहे. तर नागठाणे बंधारा हा गेल्या ९ दिवसांपासून पाण्याखाली आहे‌. शुक्रवारी सांयकाळपासून तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू आहे.

पलुस तालुक्यातील महापूराचे पाणी मंदगतीने ओसरत असतानाच शुक्रवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसामुळे कोयना धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे आमणापूर पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली होता.

मंगळवारी पूलावरून पाणी ओसरू लागल्याने पुलावरून दुचाकी, व छोट्या चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. प्रशासनाकडून आज शनिवारी सकाळपासून आमणापूर पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे पलुसचा तालुक्याचा दक्षिण भागाशी तुटलेला संपर्क पुन्हा एकदा तुटला होता. पाणीपातळी ओसरत असताना तालुक्यातील अनेक रस्ते चिखलमय झाले आहेत. तर महापूराच्या प्रचंड प्रवाहाने पुलाचा संरक्षक पाईप वाकून मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी सकाळी नागठाणे येथील बंधारा पाण्याखाली असून बंधाऱ्यावर सुमारे ७ ते ८ फुट पाणी होते. शिरगांव गावांशी संपर्क तुटला होता. नदी पाण्याकडे पाणी संथगतीने जात आहे. नदीजवळील नाईकबा मंदिरातील पाणी ओसरले असून मंदिरात गाळ साचला आहे. बंधाऱ्याजवळील रस्ता पाण्याच्या प्रवाहामुळे उखलून निघाला आहे. नागठाणे मध्ये ग्रांमपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.गावातील गटारी स्वच्छ करण्याचे काम सध्दा युध्दपातळीवर सुरू आहे.

आमणापूर पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती

Related Stories

सांगली : प्रत्येक गावात लसीकरणासाठी प्रयत्न – सुहास बाबर

Abhijeet Shinde

सांगली : माजी महापौर हारुणभाई शिकलगार यांचे निधन

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणासाठी केंद्राची भूमिका महत्वाची

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात 18 जणांचा मृत्यू ,289 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

सांगलीच्या स्टेशन चौकात पत्रकार दिन साजरा

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अडचणींकडे मंत्री नारायण राणे यांचे वेधले लक्ष

Abhijeet Shinde
error: Content is protected !!