तरुण भारत

मोस्ट वाँटेड गँगस्टर काला जेठडी दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

गुन्हेगारी विश्वात अनेक गुन्हेगार पोलिसांना चकवा देत आपले जाळे सक्रीय ठेवत असतात. अशीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा गुन्हेगार मोस्ट वाँटेड काला जेठडी याच्यावर दिल्लीसह पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ही अनेक गुन्हे दाखल आहेत. दिल्लीच्या स्पेशल सेल पोलिसांनी याला अटक केली आहे. याच्यावर सात लाखांचा इनाम होता. काला जेठडीवर लूटमार आणि हत्या या गुन्ह्यांसोबतच खंडणी वसूलीचे देखील गुन्हे दाखल आहेत.

काला जेठेडी उर्फ संदीप असे त्याचे नाव असून त्या शुक्रवार दि. ३० जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या सहारनपुर येथेून अटक करण्यात आली आहे. याच बरोबर त्याची सहकारी लेडी डॉन अनुराधा हिला देखील अटक करण्यात आली आहे. राजस्थान येथे लेडी डॉनवर हत्या, अपहरण या सारखे गुन्हे दाखल असून तीच्यावर ही १० हजारांचे बक्षिस होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काला जेठडी हा आपल्या गँगसमवेत बिश्नोई गँग चालवत होता. त्यांच्यावर अनेक प्रकारचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी गुडगाव येथील पोलिंसावर हल्ला चढवला होता. या प्रकरणात त्याला सोडवण्यात आले होते. यानंतर तो फरार होता.

Advertisements

Related Stories

सांगली जिल्ह्यात दोन नवे रुग्ण; कुंडलवाडी येथील युवकास कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

पाक दहशतवाद्याला काश्मीरात कंठस्नान

Patil_p

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोकसीला डोमिनिकामध्ये अटक

Rohan_P

अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी ‘E-emergency X-Misc visa’

datta jadhav

चार धाम यात्रेला उत्साहात प्रारंभ

Patil_p

गहू 2 रुपये, तांदूळ 3 रुपये किलोने मिळणार

tarunbharat
error: Content is protected !!