तरुण भारत

लंकन संघाला एक लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर

वृत्तसंस्था/ कोलंबो

लंकन क्रिकेट संघाने नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताला 2-1 अशा फरकाने पराभूत केल्याने लंकन क्रिकेट मंडळाने संघाला एक लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

Advertisements

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने लंकेच्या दौऱयात वनडे आणि टी-20 मालिका खेळल्या. भारताने वनडे मालिका जिंकली, त्यानंतर टी-20 मालिकेत भारताला यजमान लंकेकडून हार पत्करावी लागली. लंकन संघाने या मालिकेत भारताच्या तुलनेत सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करत मालिका जिंकली. लंकन क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी समितीने खेळाडू, प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. टी-20 प्रकारात लंकेचा भारतावर हा पहिला मालिका विजय आहे.

Related Stories

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू 10 महिन्यांपासून मानधनाविना

datta jadhav

झारखंड 324 धावांनी विजयी, इशानचे दीडशतक

Patil_p

आजपासून आयपीएलची ‘लस’

Amit Kulkarni

स्पेनचा दणदणीत विजय, स्वीडनची पोलंडवर मात

Patil_p

माजी अष्टपैलू यशपाल शर्मा काळाच्या पडद्याआड

Patil_p

कोरोनामुळे युरोपियन पात्र फेरीच्या तीन क्रिकेट स्पर्धा रद्द

Patil_p
error: Content is protected !!