तरुण भारत

स्पेन, न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत

स्पेन आणि न्यूझीलंड महिला संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. मात्र चीनचे आव्हान समाप्त झाले. शनिवारी झालेल्या प्राथमिक गटातील सामन्यात स्पेनने यजमान जपानचा 4-1 अशा गोलफरकानी पराभव करत शेवटच्या आठ संघांत स्थान मिळविले. या सामन्यात 10 व्या मिनिटाला जपानचे खाते केनॉन मोरीने उघडले. त्यानंतर स्पेनने दर्जेदार खेळ करत चार गोल नोंदवून जपानचे आव्हान संपुष्टात आणले. अन्य एका सामन्यात चीनने न्यूझीलंडचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या पराभवानंतरही न्यूझीलंडने सरस गोल सरासरीच्या जोरावर चीनला मागे टाकत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. चीनला हा सामना जिंकूनही उपांत्यपूर्व फेरीत गाठता न आल्याने या संघाची कर्णधार पेंग यांगने निराशा व्यक्त केली.

Related Stories

चाहते नसतानाही कोहली त्याच जिद्दीने खेळेल?

Patil_p

डेन्मार्क 1992 नंतर प्रथमच उपांत्य फेरीत

Patil_p

बार्सिलोनाच्या फुटबॉलपटूला दुखापत

Patil_p

कुस्तीपटू प्रिया मलिकला वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

Abhijeet Shinde

भारतासमोर आज कतारचे कडवे आव्हान

Patil_p

पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाची आघाडी

Patil_p
error: Content is protected !!