तरुण भारत

खचलेल्या भगवंतगड कॉजवेची आमदार नाईकांकडून पाहणी

प्रतिनिधी / मसुरे:

बांदिवडे व भगवंतगड जोडणाऱया कॉजवेच्या वाहून गेलेल्या भागाची शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. पाऊस संपल्यानंतर प्राधान्याने या कॉजवेच्या कामाला प्रारंभ करण्याबाबत आदेश देण्यात येतील, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली. गेल्या आठवडय़ात हा बंधारा खचून यावरून प्रवास करणे धोक्याचे बनले होते. याबाबत समीर हडकर, केदार परुळेकर यांनी लक्ष वेधले होते. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी तात्पुरती उपाययोजना करण्याबाबत त्यांनी चर्चा केली. उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शिवसेना पदाधिकारी समीर हडकर, विनायक परब, ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, उपविभागप्रमुख अनिल गावकर, युवा सेनेचे आशू मयेकर, संजय हडपी, मिलिंद चिंदरकर, बबन हडपी, प्रसाद टोपले, प्रकाश वराडकर, शेखर पालकर आदी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

‘वाशिष्ठी’तील गाळासाठी 6 डिसेंबरपासून साखळी उपोषण

Patil_p

गरिबांची भूक भागवणारेच उपाशी!

Patil_p

चिपळुणात 35 ब्रास वाळू जप्त

Patil_p

ऐन लग्नसराईत ‘मण्णपुरम’चा दणका!

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करतेवेळी सावधानता बाळगावी!

Patil_p

गीतेशच्या मृत्यूची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी-अक्रम खान

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!