तरुण भारत

‘सिक्स सस्पेक्ट्स’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

प्रतीक गांधी अन् ऋचा चड्ढा पहिल्यांदाच एकत्र

‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमधून नाव कमावलेला अभिनेता प्रतीक गांधी आता स्वतःच्या नव्या वेबसीरिजसाठी कार्यरत आहे. अभिनेत्री ऋचा चड्ढासोबत प्रतीक आता ‘सिक्स सस्पेक्ट्स’मध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये प्रतीक आणि ऋचा तपास अधिकाऱयाच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहेत. अलिकडेच ऋचा आणि प्रतीकने या सीरिजमधील स्वतःचा फर्स्ट लुक शेअर केला आहे.

Advertisements

‘मी आतापर्यंत सर्वात संशयास्पद हत्यांचा तपास केला आहे. सिक्स सस्पेक्ट्स आहेत, पण वेळ अत्यंत कमी आहे. हा गुंता सोडवू शकेन का’ असे सीरिजचा फर्स्ट लुक शेअर करताना ऋचाने नमूद केले आहे. सिक्स सस्पेक्ट्स एक क्राइम थ्रिलर असून प्रेक्षकांची शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणारी ही सीरिज ठरणार असल्याचे बोलले जात आहे. विकास स्वरुप यांचे ‘द ऍक्सिडेंटल अप्रिंटिस’ या पुस्तकावर ही वेबसीरिज बेतलेली आहे. या सीरिजची निर्मिती अभिनेता अजय देवगण करत आहे. ही सीरिज डिस्ने हॉटस्टारवर लवकरच झळकणार आहे. स्कॅम 1992 या वेबसीरिजमधील स्वतःच्या अभिनयाने प्रतीक गांधीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. याचमुळे चाहते त्याच्या नव्या वेबसीरिजची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

Related Stories

डीकपल्ड सीरिजमधून झळकणार माधवन

Amit Kulkarni

मनोरंजनासाठी रामायण, महाभारतचे दूरदर्शनवर पुनर्प्रसारण

tarunbharat

अभिनेता आफताब शिवदासानी कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

सुशांत आत्महत्या : सीबीआयकडून सिद्धार्थ पठाणीची चौकशी सुरू

Rohan_P

ही आहे शाल्वची प्रॉपर्टी

Patil_p

‘मॅडम सर’चे नवीन एपिसोड्ससह पुनरागमन!

Patil_p
error: Content is protected !!