तरुण भारत

कलाकारांनी दिला मदतीचा हात

दरा मनामध्ये भरली  या मालिकेतील सर्व कलाकारांनी एकत्र येत सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात त्यांनी कोकणवासीयांना मदतीचे आवाहन केलंय. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. या मालिकेती सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. पण या मालिकेतील कलाकारांनी अभिनयासोबतच समाजाप्रती असलेल्या आपुलकीने सुद्धा प्रेक्षकांचं मन जिंकलंय. एकीकडे कोकणात पूराने थैमान घातलं. या पूरात अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या कलाकार पुढे सरसावलेत. या मालिकेतील अभिनेत्री आणि लतिकाच्या बहिणीची भूमिका करणारी गौरी किरण या मुळच्या कोकणातील आहे. त्यामुळे कोकणातील मुलगी छोटय़ा पडद्यावर झळकत असल्याने कोकणवासीयांचे या मालिकेसोबत खूपच आपुलकीचं नातं निर्माण झालंय. कोकणात मुसळधार पावसामुळे जी परीस्थिती उद्भवली आहे, अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी या मालिकेच्या कलाकार मंडळींनी येत नागरिकांना मदतीचे आवाहन केलंय. यासाठी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील सर्व कलाकारांनी एकत्र येत सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत जास्त दिवस टिकतील असे अन्न पदार्थ, कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रs, अंथरून-पांघरुण  पोहोचवून त्यांना या संकटातून सावरण्यासाठी मदत करा, असं म्हटलंय. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेद्वारे ‘लतिका’ बनून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नायक. सध्या ती पूर परिस्थिती मदतीसंदर्भात योग्य ती माहिती पुरवण्यासाठी काम करतेय. ‘माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे. चाहत्यांचा एक मोठा वर्ग आपल्याला फॉलो करत असतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत गरजू लोकांची माहिती गेली आणि कोणाला मदत झाली तरी त्याचं समाधान आहे.

Related Stories

महाराष्ट्राची हास्यजत्राने गाठला 300 भागांचा पल्ला

Patil_p

ड्रग्ज प्रकरण : रीया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर

Rohan_P

रहस्यमय गुंत्यात अडकलेल्या नौदल अधिकाऱयाची कहाणी

Patil_p

सांग तू आहेस कामध्ये शिवानी रांगोळे

Patil_p

‘मिसेस चटर्जी व्हर्सेज नॉर्वे’मध्ये झळकणार राणी

Patil_p

मनी हाइस्ट’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

Patil_p
error: Content is protected !!