तरुण भारत

मृणाल कुलकर्णीची लवकरच खास भेट

मराठी सिनेसृष्टीतील एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीतही मृणालने आपले स्वतःचे एक वेगळे  अस्तित्व निर्माण केले आहे. पदार्पणातच लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱया या हरहुन्नरी अभिनेत्रीने प्रत्येक भूमिकेसाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अनेक ऐतिहासिक भूमिकांना तिने एका वेगळ्याच उंचीवर नेले. अभिनय, लेखन यासोबतच आपल्यातील दिग्दर्शनाला वाव देत तिने दिग्दर्शकाची भूमिकाही लीलया पार पाडली. मनोरंजन क्षेत्रातील अशी टॅलेन्टेड अभिनेत्री ‘प्लॅनेट मराठी’चा भाग असणाऱया ‘प्लॅनेट टॅलेन्ट’मध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे आता मृणाल कुलकर्णी आणि ‘प्लॅनेट मराठी’ एकत्र आल्याने काहीतरी जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की!

‘प्लॅनेट मराठी’च्या परिवाराचा भाग झाल्याबद्दल मृणाल कुलकर्णी म्हणते, ‘प्लॅनेट मराठी हे मराठी प्रेक्षकांचे हक्काचे पहिलेवहिले मराठी ओटीटी आहे. सिनेसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही त्याची जोरदार चर्चा आहे. प्लॅनेट मराठीने अल्पावधीतच आपल्या शाखा रुंदावल्या आहेत आणि अशा परिवारात प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर यांनी मला सामावून घेतल्याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करते. मराठीला सर्वदूर पोहोचवण्याचे अक्षय बर्दापूरकर यांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर उत्तम काम होत आहे. प्लॅनेट मराठीमुळे ते सातासमुद्रापार असलेल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याची खात्री आहे. एवढा मोठा प्लॅटफॉर्म पाठीशी असल्याने अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांना बळ मिळेल हे नक्की.

Advertisements

 मृणाल कुलकर्णीचा प्लॅनेट टॅलेन्टमध्ये सहभाग झाल्याबद्दल प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, मृणाल कुलकर्णींचा अभिनय क्षेत्रातील अनुभव फार दांडगा आहे. उत्तम कलाकाराबरोबरच ती उत्कृष्ट दिग्दर्शकही आहे. साहित्याचा वारसा लाभल्याने तिला साहित्याची उत्तम जाण आहे आणि तिच्या या गोष्टीचा फायदा प्लॅनेट मराठीलाही नक्कीच होईल. अशा गुणी अभिनेत्रीचे प्लॅनेट टॅलेन्टसोबत जोडले जाणे, हा ‘प्लॅनेट मराठीचा बहुमान आहे.’

  प्लॅनेट मराठी सोबत मृणाल कुलकर्णी प्रेक्षकांसाठी लवकरच एक खास भेट घेऊन येणार आहे. आता ती भेट काय असेल, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी कळ सोसावी लागेल.

Related Stories

पिता फारुख अब्दुल्लानंतर उमर अब्दुल्ला यांना देखील कोरोनाची लागण

Rohan_P

झाशी रेल्वेस्थानकाला राणी लक्ष्मीबाईंचे नाव?

Patil_p

घाबरू नका, मात्र काळजी घ्या

tarunbharat

एकाच दिवशी तब्बल 248 नवे रुग्ण

Patil_p

बिहार : एलजेपी नेता चिराग पासवान ‘आयसोलेट’

Rohan_P

उत्तराखंडात मागील 24 तासात 109 मृत्यू; 7,749 नवे कोरोनाबाधित

Rohan_P
error: Content is protected !!