तरुण भारत

सिमॉन बाईल्सची फ्लोअरमधूनही माघार

सुवर्ण कायम राखण्यासाठी न उतरण्याचा निर्णय, आज फ्लोअरची फायनल रंगणार

अमेरिकेची जागतिक स्तरावरील आघाडीची जिम्नॅस्ट सिमॉन बाईल्सने फ्लोअर एक्सरसाईज फायनलमधूनही माघार जाहीर केली. या इव्हेंटमध्येही बाईल्स विद्यमान जेती होती. मात्र, सुवर्ण आपल्याकडेच कायम राखण्याबाबत ती फारशी उत्सुक दिसून आली नाही. यापूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये ती यशस्वी ठरली तर मागील आठवडय़ात क्वॉलिफाईंग राऊंडमध्ये ती दुसरी आली होती.

Advertisements

आता बाईल्सची जागा ब्रिटनच्या जेनिफर गॅदिरोव्हा फायनलसाठी पात्र ठरली असून ही फायनल आज (दि. 2) होत आहे. उद्या (मंगळवार दि. 3) होणाऱया बॅलन्स बीम फायनलमध्ये उतरायचे का, याबद्दल बाईल्सने अद्याप काहीही ठरवलेले नाही, असे यावेळी सांगण्यात आले. पाच वर्षांपूर्वी तिने या इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.

बाईल्सने अनईव्हन बार्स व व्हॉल्ट फायनल्समध्ये आपण उतरणार नाही, असे यापूर्वीच जाहीर केले होते. जिम्नॅस्टिक्सच्या सर्व इव्हेंट ऍरिएके जिम्नॅस्टिक्स सेंटरवर सुरु आहेत. बाईल्सला बार्सवर पदक अपेक्षित नव्हते. मात्र, व्हॉल्टमध्ये ती ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. बाईल्सने आपल्या पूर्ण कारकिर्दीत फ्लोअर एक्सरसाईजमध्ये सर्वाधिक हुकूमत गाजवली असून तिने 5 वर्ल्ड चॅम्पियनशिप व रिओ सुवर्ण जिंकले आहे.  

बाईल्सला नेमके काय झाले आहे?

जागतिक स्तरावरील सर्वोत्तम जिम्नॅस्ट मानल्या जाणाऱया सिमोन बाईल्सने क्रीडा क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. बाईल्स जिम्नॅस्टिक्समधील एखाद्या इव्हेंटमध्ये उतरली असेल तर सुवर्ण तीच जिंकणार, इतका दबदबा तिने अलीकडील काही वर्षात निर्माण केला आहे. मात्र, आता हीच बाईल्स आपण ‘मॅच फिट’ नाही, असे सांगत ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च व्यासपीठावरुन माघार घेते, त्यावेळी ती निश्चितच अनाकलनीय ठरते.

बाईल्स ज्या ‘मेन्टल ब्लॉक’मुळे स्वतःला बाहेर ठेवत आहे, विविध इव्हेंट्समधून माघार घेते आहे, त्याला ‘द ट्वीस्टिज’ असे ओळखले जाते. याचा अर्थ असा की, बाईल्स ज्यावेळी हवेत झेपावते, त्यावेळी आपण ग्राऊंडवर व्यवस्थित लँड होऊ शकू की नाही, याबद्दल तिच्या मनात द्विधावस्था असते. याचा परिणाम असा होतो की, ती हवेत असताना समतोल साधू शकत नाही आणि इथे मुख्य लय बिघडून जाण्याचा धोका अधिक असतो. याचमुळे बाईल्सने यंदा ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर अपयशी होण्याऐवजी त्यातून माघार घेणे अधिक बेहत्तर मानले आहे.

Related Stories

एकतर्फी विजयासह मुंबई पुन्हा अव्वल

Patil_p

पोलंडचा हुरकाझ विजेता

Patil_p

आशिया चषक महिला फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ जाहीर

Amit Kulkarni

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Patil_p

टोकियोत सिंधू सुवर्ण जिंकू शकेल – गोपीचंद

Patil_p

मुंबई इंडियन्सची अव्वलस्थानी गरुडझेप

Patil_p
error: Content is protected !!