तरुण भारत

निरंकाल येथील जीर्ण झाडामुळे धोका

वार्ताहर /दाभाळ

गवळवाडा निरंकाल येथे अलिसाहब शेख यांच्या घरासमोरील भले मोठे आंब्याचे जर्जर झालेले झाड कोसळण्याच्या स्थितीत आहे. मायणेवाडा, बांधकडे जाणाऱया रस्त्याच्या बाजूने हे झाड झुकले आहे. हे झाड कोणत्याही क्षणी कोसळून अपघात होऊ शकतो. पंचायतीने तात्काळ ते कापून टाकण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. मागील कित्येक महिन्यापासून हे झाड वाळलेल्या अवस्थेत आहे. त्यांचे खोड जीर्ण व जर्जर झाल्याने ते कोसळण्याच्या स्थितीत आहे. या झाडाखालून मायणेवाडा ते बांधपर्यंत रस्ता जातो. या रस्त्यावरून वाहनाची सतत ये-जा सुरु असते. सध्या या झाडाच्या सुकलेल्या फांद्या अधून मधून कोसळत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर जाताना पादचाऱयांना व वाहन चालकांना सतर्क राहावे लागते. या झाडाखालून मायणेवाडा, बांद भागात वीज पुरवठा करणाऱया वीज वाहिन्या गेलेल्या आहेत. हे झाड कोसळून चार ते पाच वीज खांब कोसळण्याची शक्यता आहे. या झाडाखाली दोन घरे असून त्यांनाही कायम धोका आहे. कधी कधी लहान मुलेही या झाडाखाली खेळताना आढळतात. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच हे झाड कापून टाकण्याची मागणी केली जात आहे.

Advertisements

Related Stories

फोंडय़ात परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी उडविला लॉकडाऊनचा फज्जा

Amit Kulkarni

शिक्षणात मुलींची संख्या आणि गुणवत्ता कौतूकास्पद – डॉ. राधिका नाईक

Amit Kulkarni

कुडचडे पालिकेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Omkar B

गोव्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणीच्या नियमांत बदल

Rohan_P

गोव्याची राजकीय प्रयोगभुमी होऊ देऊ नका

Omkar B

मास्क न वापरणाऱयांना 200 रुपये दंड द्या

Omkar B
error: Content is protected !!