तरुण भारत

सिडी खराब, सांडपाणी रस्त्यावर

गोंधळी गल्लीतील प्रकार, वेताळ मंदिरासमोर दुर्गंधी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

गोंधळी गल्लीतील वेताळ मंदिरासमोर गटारीवरील सिडी पूर्णपणे खराब झाली असून गटारीमध्ये कचरा साचला आहे. परिणामी मंदिरासमोर सांडपाणी वाहत आहे.  वाहनधारकांना धोकादायक बनला आहे. सिडी नव्याने घालण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

शहरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी ठिकठिकाणी गटारी बांधण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गटारींवर सिडी घालण्यात आल्या आहेत. पण गोंधळी गल्लीतील सिडी खराब झाल्याने लोखंडी सळय़ा बाहेर आल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. पादचारी अडकून पडण्याची शक्मयता आहे. गटारीची स्वच्छता केली जात नसल्याने कचरा साचला असून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे गटारीमधून वाहणारे पावसाचे व सांडपाणी वेताळ मंदिरासमोरील रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. गटारीवरील सिडीचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशांमधून तसेच वेताळ देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे.

Related Stories

अनगोळचे भाविक सौंदत्ती यात्रेला जाणार

Amit Kulkarni

हालसिद्धनाथ यात्रेची पालखी सोहळय़ाने सांगता

Patil_p

किस्ना डायमंड फेस्टिव्हलला थाटात प्रारंभ

Amit Kulkarni

पदवीचे शिक्षण 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन; ऑक्टोबरपासून वर्ग

Patil_p

मान्सूनच्या आगमनापूर्वी ‘पाटबंधारे’ सज्ज

Patil_p

विनामास्क कारवाई केवळ वाहनधारकांवर?

Amit Kulkarni
error: Content is protected !!