तरुण भारत

Tokyo 2020 : भारतीय महिला संघाची उपांत्यफेरीत धडक

ऑनलाईन टीम

भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची मान उंचावली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० ने पराभूत करत उपांत्यफेरीत धडक मारली आहे. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करत भारतीय संघाने उपांत्यफेरीत प्रवेश केलाय.

कालच भारतीय पुरुष संघाने ग्रेट ब्रिटनचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून उपांत्य फेरीत 49 वर्षांनंतर स्थान मिळविले. तर आज भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यफेरीत धडक मारत केलेल्या या कामगिरीमुळे सुवर्णयोगच म्हणावा लागेल.

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं. जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला.

Related Stories

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहीनबागेतील आंदोलनाला पोलिसांकडून ब्रेक

tarunbharat

एअर इंडियाच्या प्रवाशांचा डाटा लीक

Patil_p

उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये वीज कोसळून ४९ जणांचा मृत्यू

triratna

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते”

triratna

शोपियां चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav

मोदी सरकारकडून गरीबांची फसवणूक

Patil_p
error: Content is protected !!